दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 11:09 IST2020-07-20T10:54:34+5:302020-07-20T11:09:11+5:30
अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध
अहमदनगर: दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभरात ठिकठिकाणी दूधआंदोलनाला सुरुवात केली आहे.
अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे.
डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार, असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
आणखी बातम्या...
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...
ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत पालिकेच्या विशेष पथकाची कारवाई, ५ टेम्पो जप्त