शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मिहान सर्वात मोठा थकबाकीदार!

By admin | Updated: August 24, 2014 01:10 IST

मनपाचा संपत्ती कर न भरणाऱ्यांच्या यादीत मिहान इंडिया लिमिटेडचे नाव आघाडीवर आहे. या कंपनीकडून मनपाला तब्बल १० कोटी ७५ लाख, ७६ हजार, ८८७ रुपये वसूल करायचे आहे.

१०.७५ कोटींचा संपत्ती कर : मोठ्या थकबाकीदारांवर १०० कोटी थकितनागपूर : नागपूर : मनपाचा संपत्ती कर न भरणाऱ्यांच्या यादीत मिहान इंडिया लिमिटेडचे नाव आघाडीवर आहे. या कंपनीकडून मनपाला तब्बल १० कोटी ७५ लाख, ७६ हजार, ८८७ रुपये वसूल करायचे आहे. पण मनपाच्या ढिम्म कारवाईने वसुली शून्य असून मनपाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सामान्य व्यक्तीने कराचा भरणा केला नाही तर मनपाचे कर्मचारी त्याच्या घरी वसुलीसाठी वारंवार फेऱ्या मारतात. अनेकदा नोटीस देऊन कारवाईच्या नावाखाली घर लिलाव करण्याची धमकीसुद्धा देतात. पण शहरात संपत्ती कर न भरणारे जवळपास १५० पेक्षा जास्त थकबाकीदार असून त्यांच्याकडून १०० कोटींपेक्षा जास्त वसुली प्रलंबित असल्याची बाब माहिती अधिकार कायद्यातून उघड झाली आहे. आयटीआय कार्यकर्ता संजय अग्रवाल यांना ही माहिती कर अधीक्षक मदन सुभेदार यांनी दिली आहे. दरवर्षी भक्कम डिमांड नोट जारी करण्याची घोषणा मनपाच्या संपत्ती कर विभागातर्फे केली जाते. पण वसुली प्रकरणात मनपा नेहमीच मागे असते. राजकीय दबावामुळे संपत्ती कराची वसुली होत नाही, ही नेहमीचीच बाब आहे. विभागाची कार्यप्रणाली यासाठी दोषी आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार बँक, व्यावसायिक प्रतिष्ठान, बिल्डर्स व डेव्हलपर्सवर सर्वाधिक संपत्ती कर थकीत आहे. शैक्षणिक संस्थाही मागे नाही. शहरातील प्रतिष्ठित इंजिनीअरिंग व कॉमर्स कॉलेजवर संपत्ती कराचे लाखो रुपये थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, अधिकांश संपत्तीधारक कर भरण्यासाठी तयार आहेत. पण त्यांना डिमांड नोट मिळालेले नाही. तसे पाहता विभाग संपत्तीधारकांच्या नावे मनपा नियमित डिमांड नोट जारी करते. मग हे डिमांड नोट जातात तरी कुठे, असा सवाल उपस्थित होतो. दरमहा दोन टक्के दंडाची तरतूद असतानाही थकबाकीदारांची संख्या वाढतच आहे. (प्रतिनिधी)