शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मध्य वैतरणा ओव्हरफ्लो नाहीच

By admin | Updated: September 19, 2015 22:50 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रांपैकी मध्य वैतरणा हा तलाव शनिवारी ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठल्या; मात्र रात्री उशिरा महापालिका प्रशासनाने खडबडून जागे

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रांपैकी मध्य वैतरणा हा तलाव शनिवारी ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठल्या; मात्र रात्री उशिरा महापालिका प्रशासनाने खडबडून जागे होत मध्य वैतरणा धरण ओव्हरफ्लो झाले नसल्याचे स्पष्ट केले. महापालिकेने सातही तलावांतील पाण्याची पातळी वाढत नसल्याने निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी अनुक्रमे २०, ५० टक्के पाणीकपात लागू केली आहे. तर सप्टेंबरच्या उत्तरार्धात होत असलेल्या पावसाने तलावांतील पाण्याची पातळी वाढेल, अशी आशा अद्यापही महापालिकेला आहे. दुसरीकडे शुक्रवारी राज्यात झालेल्या पावसाने दिलासा दिला असतानाच शनिवारी सकाळपासूनच व्हॉट्स अ‍ॅपवरून मध्य वैतरणा ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठू लागल्या. त्यांनी एवढा वेग पकडला की मुंबईवरील जलसंकट मिटणार; अशा आशयाच्या संदेशांनी धुमाकूळ घातला.अखेर यावर महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रमुख तलावांपैकी मोडक सागर धरणापासून शहराला जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी स्थिर राहण्यासाठी मध्य वैतरणा आणि अपर वैतरणा धरणाचे दरवाजे उघडून नियमित स्वरूपात पाणी घेण्यात येते. १९ सप्टेंबर रोजी याच प्रकारे वैतरणा धरणातून मोडक सागर धरणात पाणी सोडण्यात आले. शिवाय शनिवारच्या आकडेवारीनुसार, मध्य वैतरणा धरण भरलेले नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)मुसळधार पावसाचा इशारा कायम..मुंबई वगळता शुक्रवारी राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच पुढील ७२ तासांसाठी राज्याला देण्यात आलेला मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे; तर मुंबईत पुढील ४८ तासांत अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.राजस्थान, पंजाब व हरियाणाच्या काही भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा शनिवारीही कायम आहे; तर दुसरीकडे विदर्भ आणि लगतच्या भागावर असलेल्या खोल दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे; शिवाय आता ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैर्ऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर आहे. मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे; तर गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.