शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भामधील एमआयडीसीत दलालांचेच भूखंड अधिक

By admin | Updated: September 23, 2015 01:12 IST

पश्चिम विदर्भात एमआयडीसींमध्ये दलालांचेच अधिक भूखंड असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दलालांच्या इशाऱ्यावर एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी धावत

यवतमाळ : पश्चिम विदर्भात एमआयडीसींमध्ये दलालांचेच अधिक भूखंड असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दलालांच्या इशाऱ्यावर एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी धावत असल्याने ते म्हणतील त्यालाच एमआयडीसीत प्लॉट मिळत आहेत. सध्या दलालांच्या आडोशाने बहुतांश बीअरबार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी हे प्लॉट हडपले आहेत. एमआयडीसीत उद्योग सुरू न केलेले भूखंड परत घेण्याची भाषा केली जात असताना आजही अनेकांजवळ आठ ते दहा वर्षांपासून उद्योगाशिवाय भूखंड पडून आहेत. फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या गाड्या, खताचे कारखाने यासाठी ते भाड्याने दिलेले आहेत. दलालांनी यवतमाळ, अमरावती व मुंबईच्या एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना‘मॅनेज’ केले आहे. प्रती एकर जमिनीमागे अधिकाऱ्यांची तीन लाख रुपयांचे ‘मार्जिन’ असल्याचे खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. एकट्या यवतमाळ एमआयडीसीत वर्धेतील कुकरेजा आणि अकोल्यातील वीरवाणीनामक दलालांची चालतीआहे. यवतमाळातील शंभरावरभूखंड वेगवेगळ्या नावानेवीरवाणीच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. यवतमाळमध्ये एका नामांकित हॉटेलचा मालक, दारूचा होलसेलर, मिल मालक, हार्डवेअर, ग्लास व किराणा व्यावसायिक तसेच वणीतील हॉटेलमालक आदींनी भूखंड घेतले आहेत. एका दारूच्या होलसेलरने तर थेट मुंबईतून अडीच एकरांचा भूखंड मिळविला. अनेकांनी दालमिल, जिनिंग प्रेसिंग, आॅइल मिल थाटणार असल्याचे सांगून भूखंड घेतले. यवतमाळचे क्षेत्र अधिकारी, अमरावतीमधील प्रादेशिक अधिकारी, ट्रेसर, लिपिक, दलाल, मुंबईतील डेप्युटी सीईओ अशा साखळीतून मर्जीतील व्यक्तींना एमआयडीसीतील औद्योगिक भूखंडांचे सोयीने वाटप केले जाते. १५ रुपये चौरस फूट दर असलेल्या भूखंडासाठी केवळ मार्जीन म्हणून सात रुपये प्रती चौरस फूट अतिरिक्त दर आकारला जातो. मात्र आकारलेल्या दरांबाबतचे कुठेही रेकॉर्ड ठेवले जात नाही. (प्रतिनिधी)