पहाटेच्या वेळेस मेट्रोचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत

By Admin | Updated: June 18, 2014 20:05 IST2014-06-18T15:46:44+5:302014-06-18T20:05:19+5:30

मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करणा-या मेट्रोचे भाडे सकाळी ५.३० ते ८ दरम्यान अवघे पाच रुपये असणार आहे.

The metro travels in the morning at just 5 rupees | पहाटेच्या वेळेस मेट्रोचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत

पहाटेच्या वेळेस मेट्रोचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १८ -  मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करणारी मेट्रो आता स्वस्तही होणार आहे. सकाळी ५.३० ते ८ दरम्यान मेट्रोचे तिकीट अवघे पाच रुपये असणार आहे. उद्यापासून आठवडाभर प्रायोगिक तत्वावर तिकीटाची ही सवलत असेल. त्यामुळे सकाळच्या वेळात प्रवाशांना स्वस्तात मस्त, सुखकर आणि वेगवान प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना 'मेट्रो'कडे आकर्षित करण्यासाठी 'मुंबई मेट्रो वन' कंपनीने ही योजना आणली आहे.
या योजनेनुसार सकाळी ५.३० ते ८ या वेळेत हा स्वस्त प्रवास करता येणार असून कोणत्याही दोन स्थानकांदरम्यान अवघ्या ५ रुपयांत प्रवास करता येईल. ही सेवा स्मार्टकार्डधारकांसाठीही उपलब्ध असून टोकन घेतल्यापासून अर्ध्या तासात प्रवास सुरू करणे बंधनकारक आहे. 

Web Title: The metro travels in the morning at just 5 rupees