शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

देशाला संदेश द्यायचा होता !

By admin | Updated: December 2, 2014 04:37 IST

मुस्लीम धर्मात महिलांना तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करायला विरोध आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला त्याबद्दल धडा शिकवला तर संपूर्ण देशाला सबक मिळेल

मुंबई : मुस्लीम धर्मात महिलांना तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करायला विरोध आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला त्याबद्दल धडा शिकवला तर संपूर्ण देशाला सबक मिळेल, म्हणून गौहर खानवर हात उचलला, अशी धक्कादायक कबुली कॅटरिंगवाल्याकडे मजुरी करणाऱ्या मोहंमद अकील या २४ वर्षीय तरुणाने आरे पोलिसांना दिली.काल अकीललने सर्वांसमोर गौहरच्या कानशिलात भडकावली व तिच्याशी असभ्य वर्तन केले. ही घटना फिल्मसिटीतल्या इंडियाज रॉ स्टार या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर घडली. या शोमध्ये गौहर निवेदिकेच्या भूमिकेत होती. काल या शोच्या चित्रीकरणाचा अखेरचा दिवस होता.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्याहून रोजीरोटीसाठी मुंबईत आलेला अकील पडेल ते काम करीत असे. गेल्या काही दिवसांपासून तो कॅटरिंग चालकाकडे वेटर म्हणून काम करीत होता. गेल्या तीनेक दिवसांपासून काम आटोपून तो फिल्मसिटीत येई. येथील ९ नंबरच्या स्टुडिओत गौहरचे शूटिंग सुरू होते. नेहमीप्रमाणे कालही अकील या स्टुडिओत बघ्यांच्या गर्दीत उपस्थित होता. मात्र अचानक तो सेटवर गेला आणि त्याने चारचौघात गौहरच्या कानशिलात भडकावली. अचानक घडलेल्या या घटनेने गौहर भयभीत झाली, तर हा प्रकार पाहााारे सर्वच अवाक् झाले. भानावर आलेल्या काहींनी धावपळ करून अकीलला पकडले. गर्दीतल्याच कोणीतरी पोलिसांना फोन करून सेटवर बोलावून घेतले. पुढे आरे पोलिसांनी गौहरच्या तक्रारीवरून अकीलविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला व त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत धाडले आहे.मिळालेल्या माहितीनुसार अकीलला या कृत्याचा जराही पश्चाताप नाही. दहावी शिकलेल्या अकीलवर धर्माचा पगडा असून तोकडे कपडे घालणाऱ्या महिलांबाबत त्याच्या मनात चीड आहे. गौहरवर हल्ला केल्यास हा संदेश देशभर जाईल आणि आपलीही प्रसिद्धी होईल, या विचाराने त्याने हा हल्ला केला, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. (प्रतिनिधी)