शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैला होणार: अमित देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 2:53 PM

लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल..

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय परिस्थितीनुसार

पुणे : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षेसाठी विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे.  त्यानुसार सर्व अटी व नियमांचे पालन करून परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर  केले जाईल. येत्या १५ जुलै पासून वैद्यकीय विभागाच्या परीक्षा सुरु होतील. ही माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.       आज पुण्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पत्रकाराशी संवाद साधला असता त्यांनी अनेक विषयावर भाष्य देखील केले.     देशमुख म्हणाले, वैद्यकीय विभागाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहेत तिथेच परीक्षा घेण्यात येथील असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवास करण्याची आवश्यकता भासणार नाही. पुढे ते म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष वेळेनुसारच सुरू करण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाणार आहे. तसेच राज्यातील अनेक भागात डॉक्टर, नर्स हे युद्ध पातळीवर काम करत आहे. त्या सर्वांच्या कार्याला माझा सलाम आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्स किंवा जी काही पदे रिक्त असतील. ती भरण्यासाठी मंजूर देण्यात आली असून त्या संदर्भातील कार्यवाहीस सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.       राज्यात एका बाजूला करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत बरे होऊन घरी जाणार्‍याची संख्या देखील अधिक प्रमाणात आहे. हे पाहून समाधान वाटते आहे. मात्र त्यामध्ये मृत्यू दर कशा प्रकारे कमी करता येईल, याकडे सरकारचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.   --------- मुंबईच्या धर्तीवर पुण्यात देखील खासगी लॅबचे दर निम्म्यावर आणणार     पुण्यात करोना टेस्ट करण्यासाठी साडे चार हजाराहून अधिक दर खासगी लॅब आकारतात. त्या प्रश्नावर ते म्हणाले, राज्य सरकारने मुंबईत दोन हजार रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला. आता त्याच धर्तीवर पुण्यात देखील निम्म्यावर दर आकारले जातील, असा निर्णय सरकार घेईल. अशी माहिती देशमुख यांनी दिली.  दिली.

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थीexamपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याcollegeमहाविद्यालयAmit Deshmukhअमित देशमुख