36क् गुण मिळाले तरच मेडिकलला प्रवेश!

By Admin | Updated: June 3, 2014 01:30 IST2014-06-03T01:30:10+5:302014-06-03T01:30:10+5:30

खुल्या प्रवर्गातील विद्याथ्र्याना 36क् गुण तर मागास प्रवर्गातील विद्याथ्र्याना 288 गुण मिळविले तरच वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज भरता येणार आह़े

Medical admission only after getting 36 points! | 36क् गुण मिळाले तरच मेडिकलला प्रवेश!

36क् गुण मिळाले तरच मेडिकलला प्रवेश!

>जागा रिक्त राहण्याचा धोका : अभ्यासक्रम एनईईटीचा अन् प्रवेशपात्रता निकष सीईटीचा
धर्मराज हल्लाळे - नांदेड
वैद्यकीय प्रवेशासाठी 2क्13मध्ये झालेली एनईईटी रद्द करून 2क्14 पासून पुन्हा एमएच-सीईटीच घेण्याचा निर्णय झाला होता़ त्याचवेळी वैद्यकीय प्रवेश मिळविण्यासाठी पात्रता निकष मात्र पर्सेन्टाइल न ठेवता पर्सेन्टेज ठेवला आह़े त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्याथ्र्याना 36क् गुण तर मागास प्रवर्गातील विद्याथ्र्याना 288 गुण मिळविले तरच वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज भरता येणार आह़े 
सध्याच्या सीईटी परीक्षेचा एनईईटी अभ्यासक्रम, नकारात्मक गुणदान पद्धत आणि वैद्यकीय प्रवेशपात्रता निकष याची तुलना पाहता काठिण्य पातळी वाढली आह़े गतवर्षी खुल्या प्रवर्गात मराठवाडा, विदर्भ वगळून उर्वरित महाराष्ट्रात 327 गुणांर्पयत वैद्यकीय प्रवेश निश्चित झाला होता़ तर मराठवाडा, विदर्भात 325 गुण मिळविणा:यांनी वैद्यकीय प्रवेश मिळविला़ राखीव प्रवर्गात तर 2क्क् पेक्षा कमी गुण मिळविणारे विद्यार्थीही प्रवेशपात्र ठरल़े 
त्यामुळे 72क् पैकी 5क् टक्के व 4क् टक्के गुण मिळविण्याच्या या वर्षीच्या निकषानुसार मेडिकलच्या जागा रिक्त राहण्याचा धोका निर्माण झाला आह़े वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माहितीपत्रकानुसार पर्सेन्टाईलऐवजी पर्सेन्टेजचा मुद्दा समोर आला आह़े दरम्यान, वैद्यकीयसाठी 2क्12 र्पयत एमएच-सीईटी घेण्यात येत होती, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र या तीन विषयांत एकूण 2क्क् गुणांची परीक्षा होत होती़ त्यामध्ये केवळ राज्य मंडळाचा 12 वीचा अभ्यासक्रम समाविष्ट होता़ त्यात नकारात्मक गुणदान पद्धत नव्हती़ त्यामुळे एमएच-सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याना वैद्यकीय प्रवेश घेताना पर्सेन्टेज हा निकष होता, ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 5क् टक्के तर राखीव प्रवर्गासाठी 4क् टक्के गुण मिळविणो अनिवार्य होत़े म्हणजेच अनुक्रमे 1क्क् व 8क् गुण मिळविणारा विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरत होता़ दरम्यान, 2क्13 पासून देशपातळीवर एनईईटी घेण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे एनईईटी उत्तीर्ण विद्याथ्र्याना वैद्यकीय प्रवेश घेताना पर्सेन्टाइल हा निकष होता़ दरम्यान, एनईईटी परीक्षा पद्धतीबाबत विविध राज्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह होत़े ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयार्पयत गेल़े त्यानंतर महाराष्ट्र शासनाने अखेर एमएच-सीईटीच राबविण्याचा निर्णय  घेतला़ मात्र त्यात प्रवेशाचा निकष अनुक्रमे 5क् व 4क् पर्सेन्टेज निकष ठेवल्याने खाजगीबरोबरच शासकीय वैद्यकीयच्या जागासुद्धा रिक्त राहतील, अशी भीती आह़े 
 
पर्सेन्टेजचा घोऴ़़ पर्सेन्टाइल योग्य
च्एमएच-सीईटी 2क्14 मध्ये 72क् गुणांची परीक्षा झाली़ पर्सेन्टेज निकषाप्रमाणो खुल्या प्रवर्गासाठी 5क् टक्के व राखीव प्रवर्गासाठी 4क् टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी वैद्यकीयचा प्रवेश अर्ज भरू शकतील़ 
च्पर्सेन्टाइल निकषाप्रमाणो एकूण परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यापैकी उतरत्या क्रमाने जो मध्यांक निघेल, त्यापेक्षा अधिक गुणांचे सर्व विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र ठरतील़ त्यामुळे पर्सेन्टाइल ही पद्धत अधिक योग्य ठरते, असे मत शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी व्यक्त केल़े सध्याची परीक्षा एनईईटीच्या धर्तीवर आह़े त्यामुळे मेडिकलच्या प्रवेशाचा निकष सुद्धा एनईईटीप्रमाणो असायला हवा, असेही ते म्हणाल़े 

Web Title: Medical admission only after getting 36 points!