शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएच्या फडात राजकीय कुरघोडी

By admin | Updated: June 10, 2015 03:12 IST

एमसीएच्या निवडणुकीत राजकीय कुरघोडी रंगली आहे. क्रिकेट फर्स्ट गटाचे विजय पाटील यांनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) त्रैवार्षिक निवडणुकीत राजकीय कुरघोडी रंगली आहे. क्रिकेट फर्स्ट गटाचे विजय पाटील यांनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, शिवसेना खा. राहुल शेवाळे, आ. प्रताप सरनाईक उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट फर्स्ट पॅनलला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी-भाजपा आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस असे नवीन समीकरण समोर आले आहे. बुधवार, १७ जून रोजी एमसीएच्या १७ सदस्यीय कार्यकारिणीसाठी मतदान होणार आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवार यांना क्रिकेट फर्स्ट आणि बाळ म्हाडदळकर या दोन्ही गटांचा पाठिंबा असल्याने पवारांची निवड निश्चित मानली जात होती. गेल्या वेळी पवारांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र यंदा शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे क्रिकेट फर्स्ट पॅनेलने विजय पाटील यांच्या रूपाने तगडा प्रतिस्पर्धी उतरवला आहे. क्रिकेट फर्स्ट गटाला मागील निवडणुकीत १७पैकी केवळ ४ जागा राखता आल्या होत्या. यंदा शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे क्रिकेट फर्स्टचे बळ वाढले आहे. एमसीएचे मतदार असणाऱ्या ३२९ क्लब व संस्थांपैकी ४५ संस्थांवर थेट शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवाय नवी मुंबईत भव्य असे डी.वाय. पाटील स्टेडियम उभारणाऱ्या विजय पाटील यांचा स्वत:चा संपर्क मोठा आहे. २०११पासून पाटील एमसीएचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. चुरशीची लढतअध्यक्षासह उपाध्यक्षपदासाठी यंदा मोठी चुरस असेल. पवार-म्हाडदळकर गटाकडून मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी दावा ठोकला आहे. तर, क्रिकेट फर्स्टकडून शिवसेना खा. राहुल शेवाळे आणि आ. प्रताप सरनाईक मैदानात आहेत.