शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ७00 फेऱ्यांवर गदा

By admin | Updated: September 14, 2016 06:04 IST

ग्रामीण भाग शहरांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या एसटी महामंडळाने अजब पवित्रा घेतला आहे.

मुंबई : ग्रामीण भाग शहरांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या एसटी महामंडळाने अजब पवित्रा घेतला आहे. फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करत असल्याचे कारण देत, चार महिन्यांत लांब पल्ल्याच्या तब्बल ७00 बस फेऱ्यांवर गदा आणली आहे. अनेक आगारांतून सुटणाऱ्या फेऱ्यांवर गदा आल्याने आगारांचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, आगारातील कर्मचाऱ्यांच्या पगारांपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असून, अनेक सोईसुविधा दिल्या जात आहेत. एकीकडे सोईसुविधांचा वर्षाव केला जात असतानाच, दुसरीकडे थेट प्रवासी नसल्याने फेऱ्यांच्या सुसूत्रीकरणाचे कारण पुढे करत, लांब पल्ल्याच्या अनेक फेऱ्या कमी केल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. एप्रिल ते जून हा गर्दीचा काळ मानला जातो. मे महिन्यापासूनच लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली. मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा, सिंधुदुर्ग, धुळे, रत्नागिरी विभाग व आगारांतील बस फेऱ्यांवर तर गदाच आणण्यात आली. जवळपास ५७ ते ७५ टक्के प्रत्येक आगारांतील फेऱ्यांचे भारमान असताना, फेऱ्या कमी करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २0१६ मधील मे ते आॅगस्ट या चार महिन्यांत जवळपास ७00 फेऱ्यांवर गदा आणण्यात आल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही आगारांचे उत्पन्न कमी होतानाच, तेथील कर्मचाऱ्यांचे पगारही उशिरा होऊ लागले आहेत. धुळे विभागातील दहा आगारांपैकी सहा आगारांत याच कारणांमुळे कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने झाले. हीच परिस्थती सिंधुदुर्ग व रत्नागिरीत निर्माण झाली. सुसूत्रीकरणाच्या नावाखाली फेऱ्यांवर गदा आणली जात असल्याने, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्राधान्य देण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)