शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाची कर्जप्रकरणे धूळ खात

By admin | Updated: November 17, 2014 00:21 IST

अण्णा भाऊ साठे महामंडळ : शासनाकडून वर्षभर दमडीचाही निधी नाही; कार्यालयाचाही अनागोंदी कारभार

गोरगरीब व मागासवर्गीय समाजातील लोकांचा आर्थिक विकास करण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य शासनाने विविध आर्थिक महामंडळे स्थापन केली; परंतु ही महामंडळे म्हणजे या समाजातील जनतेचे शोषणाचे अड्डे बनले आहेत. कधी निधी आहे, तर अर्ज नाहीत व अर्ज आहेत तर पुरेसा स्टाफ नाही, असा त्यांचा व्यवहार. प्रकरणे मंजूर करतानाही एजंटांची साखळी मजबूत. साहेबाला खूश केल्याशिवाय कागद हलत नाही, असा अनुभव. या सर्व महामंडळांच्या कोल्हापुरातील कार्यालयांचा ‘व्यवहार’ मांडणारी वृत्तमालिका आजपासून....!संदीप खवळे ल्ल कोल्हापूरमातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाला नोव्हेंबर महिना संपत आला, तरी यावर्षीचा निधीच मिळालेला नाही़ परिणामी, महामंडळाने यावर्षी कोणतीही नवीन प्रकरणे बँकेकडे पाठवलेली नाहीत़ सन २०१३-१४च्या प्रकरणांचा निपटारा करण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे़ बँकानी मंजुरी देऊनही निधीअभावी बीजभांडवल आणि अनुदान योजनेतील सुमारे तीनशे प्रस्ताव एप्रिलपासून धूळ खात आहेत़ यात जिल्ह्यातील अनुदान योजनेच्या १६०, तर बीजभांडवल योजनेतील ३४ प्रस्तावांचा समावेश आहे़महामंडळाकडे सध्या विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य अनुदान आणि बीजभांडवल योजना या दोनच योजना सुरू आहेत़ शासनाने सर्व मागासवर्गीय महामंडळाची ३१ मार्च २००८ पर्यंतची सर्व कर्जे माफ केल्यानंतर महामंडळ आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज, प्रशिक्षण, लघुश्रेणी वित्त तसेच महिला समृद्धी आणि महिला किसान तसेच शिक्षण कर्ज योजनांना निधी देणे बंद केले आहे. त्यामुळे सगळा भार महामंडळाकडील अनुदान आणि बीजभांडवल योजनेवर पडला आहे़ अनुदान योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते़ याअंतर्गत चाळीस हजार रुपयांचे कर्ज आणि दहा हजार रुपये अनुदान दिले जात़े कृषी, दुग्धपालन, तसेच किराणा मालाचे दुकान, चहा स्टॉल तसेच अन्य छोट्या व्यवसायांसाठी हे अर्थसाहाय्य देण्यात येते़ बीजभांडवल योजनेत लाभार्थ्यांना पन्नास हजार ते सात लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते़ यामध्ये पंचेचाळीस टक्के कर्ज महामंडळ देते़ अर्थसाहाय्याची विभागणी महामंडळाचे दहा हजार रुपयांच्या अनुदानासह पंचेचाळीस टक्के कर्ज, ५० टक्के बँक कर्ज व ५ टक्के अर्जदाराचा सहभाग अशी असते़ हॉटेल, वाहन, तसेच लघुउद्योगांसाठी अशा प्रकारचे कर्ज दिले जाते़ बँकेच्या मर्जीवर अर्जदाराच्या प्रस्तावाची मंजुरी अवलंबून असते़ कर्जप्रस्ताव राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठविले जात असल्यामुळे कर्ज मिळेलच याची शाश्वती नसते़ त्यामुळे बरेचसे प्रस्ताव बँकेकडून दरवर्षी परत पाठविण्यात येतात़ गेल्या दोन वर्षांत अनुदान आणि बीजभांडवल योजनेचे सुमारे शंभर प्रस्ताव बँकेने परत पाठविलेत.राजकीय हस्तक्षेप, अपुरा निधी आणि पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची वानवा अशा अवस्थेत अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचा गाडा सुरु आहे़ कोल्हापुरातील महामंडळाच्या कार्यालयाचे व्यवस्थापक शिंदे यांच्यावर सोलापूरच्या महामंडळाच्या व्यवस्थापकपदाचाही अतिरिक्त भार असल्यामुळे शिंदे बऱ्याचदा कोल्हापूर येथील कार्यालयात उपस्थित नसतात़ आधीच सहा महिने निधी नाही, त्यातच साहेब खुर्चीवर नाहीत, अशी परिस्थिती येथे पाहावयास मिळते़ (क्रमश:)पंधरा दिवसांत निधीचे वाटप दरवर्षी जूनमध्ये पहिला हप्ता मिळतो़; पण निवडणुका व अन्य कारणांमुळे हा निधी रखडला़ यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अनुदान योजनेसाठी १६ लाख, तर बीजभांडवल योजनेसाठी २१ लाख रुपयांच्या अनुदान निधीची तरतूद आहे़ येत्या काही दिवसांत हा निधी मंजूर होईल. - दीपक खुडे, विभागीय व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडऴ१मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सामाजिक न्याय योजनेअंतर्गत ११ जुलै १९८५ ला महामंडळाची स्थापना़ २मातंग समाजातील १२ पोटजातींचा महामंडळात समावेश३२६ जून २०१३ रोजीचे अधिकृत भाग भांडवल ३०० कोटी़, हजारो कुटुंबांना लाभ ४जिल्ह्यातील अनुदान योजनेच्या १६०, तर बीजभांडवल योजनेतील ३४ प्रस्तावांचा समावेश५बीजभांडवल योजनेत लाभार्थ्यांना पन्नास हजार ते सात लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते़