आधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नंतर मुंबई-नाशिक मार्ग, मुंबईला येणे झाले 'अवजड'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 05:48 IST2026-02-06T05:47:23+5:302026-02-06T05:48:23+5:30

Mumbai-Nashik Highway: ठाण्यातील माजिवडा ते मानपाडा दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रुस्तमजी गृहसंकुलासमोर टेम्पोचा अपघात झाल्याने मोठी वाहतूककोंडी झाली.

Massive Traffic Jam on Mumbai-Nashik Highway; Mumbai-Pune Expressway Clears After 33 Hours | आधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नंतर मुंबई-नाशिक मार्ग, मुंबईला येणे झाले 'अवजड'!

आधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नंतर मुंबई-नाशिक मार्ग, मुंबईला येणे झाले 'अवजड'!

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटून तब्बल ३२ तास वाहतूककोंडीची घटना ताजी असतानाच, मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी प्रवाशांना वाहतूककोंडीचा फटका बसला. ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर अवजड वाहनाचा अपघात झाल्याने नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. माजिवडा ते थेट मानपाडा या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर सिमेंटच्या दुभाजकांना धडकून तो नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारला धडक देत रस्त्याच्या मधोमध थांबला. त्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी झाली. याचा फटका शहरांतर्गत अधिक बसला. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला केली. यासाठी अर्ध्या तासांहून अधिक वेळ लागल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव पुलाजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेला आकाश पुजारी (वय २०) हा मुंबईतील दहिसर येथील रहिवासी होता. तो त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी मित्रांसह दुचाकीवरून जात होता.

३३ तासांनी मुंबई-पुणे महामार्ग मोकळा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ज्वलनशील गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने जाम झालेला रस्ता गुरुवारी ३३ तासांनी मोकळा झाला. या कोंडीस जबाबदार असलेल्या टॅंकरचालकाविरोधात खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या कोंडीत अडकलेल्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या प्रकाराची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले आहेत. 

Web Title : मुंबई यात्रा मुसीबतें: दुर्घटनाओं से पुणे, नासिक मार्ग बाधित, देरी

Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे और मुंबई-नासिक राजमार्ग पर दुर्घटनाओं के कारण भारी जाम लग गया। एक टैंकर दुर्घटना ने एक्सप्रेसवे को 32 घंटे तक अवरुद्ध कर दिया, जबकि एक ट्रक दुर्घटना ने नासिक-मुंबई यातायात को बाधित कर दिया। एक अलग राजमार्ग दुर्घटना में एक व्यक्ति की मौत हो गई। मुख्यमंत्री ने एक्सप्रेसवे पर भीड़ की जांच के आदेश दिए हैं।

Web Title : Mumbai Travel Troubles: Accidents Snarl Pune, Nashik Routes, Causing Delays

Web Summary : Accidents on the Mumbai-Pune Expressway and Mumbai-Nashik Highway caused severe traffic jams. A tanker accident blocked the expressway for 32 hours, while a truck accident disrupted Nashik-Mumbai traffic. One person died in a separate highway accident. The Chief Minister has ordered an inquiry into the expressway congestion.