शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर आंदोलनात मनसेची उडी!

By admin | Updated: November 7, 2014 04:09 IST

शेतकरी संघटनेच्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्वाळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे

इस्लामपूर (जि़ सांगली) : शेतकरी संघटनेच्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्वाळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती रघुनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यानिमित्ताने मनसेचे आता ग्रामीण भागात आपले पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, ऊसदर आंदोलनात मनसेने उडी घेतल्याने अनेक भागांत खळ्ळ् खट्याकचा आवाज घुमण्याची चिन्हे आहेत़ शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली़ भेटीत राज यांना राज्यातील साखर कारखानदारी, ऊसशेती आणि ऊसदराचे आंदोलन याची पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. उसाचा प्रतिएकरी व प्रतिटन उत्पादन खर्च, शासनाकडून प्रतिटन आकारण्यात येणारा कर, कारखान्यातील उपपदार्थ निर्मिती, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट, झोनबंदी, मोलॅसिसवरील बंदी, साखरेचा विनियोग अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे यांनी तपशीलवार माहिती घेतली. उत्पादित होणाऱ्या साखरेपैकी २० टक्के साखर जनतेसाठी, तर ८० टक्के साखर बड्या उद्योगांकडे जाते. मग उसाला चांगला आणि योग्य भाव मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर यंदाच्या ऊसदर आंदोलनात शेतकरी संघटनेच्या बरोबरीने मनसे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात रस्त्यावर उतरेल, अशी ग्वाही राज यांनी दिली़ यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, चिटणीस विनायक अभ्यंकर, मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोतरे, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले उपस्थित होते. (वार्ताहर)