शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाला स्थगिती कायमच !

By admin | Updated: December 19, 2014 05:16 IST

मराठा समाजास १६ टक्के व मुस्लीम समाजास पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला होता

नवी दिल्ली : मराठा समाजास सरकारी नोक-या व शैक्षणिक प्रवेशांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयास अंतरिम स्थगिती देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिल्याने महाराष्ट्र सरकारच्या पदरी अपयश आले.मराठा समाजास १६ टक्के व मुस्लीम समाजास पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला होता. त्याविरुद्ध केतन तिरोडकर व संजित शुक्ला यांनी केलेल्या जनहित याचिका दाखल करून घेत उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास पूर्णपणे व मुस्लीम आरक्षणास केवळ नोकरी व खासगी शिक्षण संस्थांमधील प्रवेशापुरती अंतरिम स्थगिती दिली होती. हा निकाल झाला तोपर्यंत राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. नव्या सरकारनेही या आरक्षणाची पाठराखण करीत उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या दोन विशेष अनुमती याचिका गुरुवारी सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु, न्या. ए. के. सिक्री व न्या. आर. के. अगरवाल यांच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणीस आल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)