शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ बंदी निर्णयाचा अनेकांचा धसका

By admin | Updated: August 21, 2014 22:17 IST

राज्यात एका कार्यालयावर किमान ५00 जणांना रोजगार

खामगाव: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओ कार्यालय बंद करण्याच्या घोषणोमुळे करुन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावले उचलली असली तरी आरटीओवर अवलंबून असणार्‍या सुमारे २५ ते २६ हजार दलाल व त्यांच्याकडे काम करणार्‍या लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. गडकरी यांनी आरटीओ व वाहतूक पोलिसांना डोळ्य़ासमोर ठेवून केलेली ही घोषणा आहे. केवळ आरटीओमध्ये भ्रष्टाचार होतो, असे म्हणणे चुकीचे ठरेल. घोषणा केली म्हणजे आरटीओ बंद झाले असे नाही. मोटर वाहन कायदा १९८९ नुसार आरटीओचा कारभार चालत असतो. आरटीओचे काम केवळ वाहन परवाना देणे इतके नसून नवीन गाडीचे रजिस्ट्रेशन, सार्वजनिक वाहनांना उदाहरणार्थ एसटी ला परमिट देणे, त्याशिवाय रिक्षा- टॅक्सीचे परमिट चालक, वाहक परवाना आदी कामे आरटीओलाच करावी लागतात. गेल्या १४ वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे महसुलात २000 पासून २0१४ पर्यंत ४00 कोटी रुपयांवरुन साडेपाच हजार कोटी इतकी वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ झाली नाही. एवढेच नाहीतर अनेकांना आरटीओच्या नियमांची माहिती नसते. रांगेत उभे राहण्यास कोणी तयार नसते. त्यामुळे दलालांचा आधार घेतला जातो. त्यामुळे नागरिकांना परवान्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यातील काही पैसे आरटीओच्या कर्मचारी व अधिकार्‍यांना मिळत असतीलही पण सरसकट आरटीओचे कर्मचारी व अधिकारी भ्रष्ट्राचारी आहेत, असे म्हणणे कितपत योग्य ठरेल. ** आरटीओ बंद करुन एक चांगली पर्यायी व्यवस्था आणणे योग्य असले तरी बेरोजगार होणार्‍या लोकांचे काय याचा विचार सरकारला करावाच लागेल. एका आरटीओवर ५00 कर्मचारी असतील तर राज्यातील सर्व कार्यालयावर किमान २५ ते २६ हजार लोकांना रोजगार मिळतो. ** नवी वाहतूक व्यवस्था आणने चांगले आहे. पण, एखादे सरकारी कार्यालय भ्रष्ट्रारी आहे. म्हणून त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा बंद करण्याचा मार्ग कितपत योग्य आहे. असेही एका अधिकार्‍यांने सांगितले. ** आरटीओमध्ये १९ हजार कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांची साडेतीन हजार मंजूर पदे आहेत. यापैकी ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे परवाना अथवा गाडी रजिस्ट्रेशनसाठी विलंब होतो. त्यामुळेही लोक दलालांकडे वळत आहेत, असे आरटीओच्या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.