शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

असंख्य चौकशी अहवाल धूळ खात

By admin | Updated: May 15, 2015 02:49 IST

एखाद्या दुर्घटनेनंतर चौकशी समिती बसवायची आणि काही महिने वेळ काढल्यानंतर तो अहवाल गुंडाळून ठेवायचा, हा आजपर्यंतचा पालिकेचा

मुंबई : एखाद्या दुर्घटनेनंतर चौकशी समिती बसवायची आणि काही महिने वेळ काढल्यानंतर तो अहवाल गुंडाळून ठेवायचा, हा आजपर्यंतचा पालिकेचा रिवाज. त्यामुळे अशा अनेक मोठ्या आगीच्या दुर्घटनांची चौकशी होऊन अहवालांचे ढिग वाढले. परंतु कारवाई काही झाली नाही. काळबादेवी येथील दुर्घटनेने अग्निशमन दलातील तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.२०१० मध्ये बोरिवली येथील व्यापारी संकुलाच्या तळघरात आग लागली. ही आग विझविताना प्रदीप झगडे या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटताच मुंबईतील व्यापारी संकुलांची छाननी सुरु झाली. या घटनेच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने व्यापारी संकुलांमध्ये सुरु असलेल्या उल्लंघनाकडे लक्ष वेधले. मात्र पाच वर्षांनंतरही अनेक व्यापारी संकुल नियम धाब्यावर बसवून मुंबईकरांचा जीव धोक्यात घालत आहेत. मंत्रालयातील भीषण आगीने तीन वर्षांपूर्वी सर्वच सरकारी कार्यालयांची झोप उडवली होती. या दुर्घटनेनंतर मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीच्या नेतृत्त्वाखाली उपसमिती स्थापन झाली. या समितीमार्फत मुंबईतील पुरातन वास्तुंच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार होत्या. मात्र आत्तापर्यंत जुने कस्टम हाऊस, मुंबई उच्च न्यायालय आणि मंत्रालय या तीन वास्तुंचे आॅडिट होऊ शकले आहे. (प्रतिनिधी)