शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांचा बळी देणारी मांत्रिक गजाआड

By admin | Updated: December 31, 2014 01:11 IST

मठ बांधण्यासाठी दोन महिलांचा बळी देणाऱ्या महिला मांत्रिकासह १० जणांना सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली.

घोटी (नाशिक) : मठ बांधण्यासाठी दोन महिलांचा बळी देणाऱ्या महिला मांत्रिकासह १० जणांना सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. बळी दिलेल्या महिलेच्या मुलाने दफन केलेली जागा दाखविल्यानंतर तेथे उत्खननानंतर पोलिसांना दोन महिलांचे मृतदेह मिळाले.संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आले. घोटीपासून जवळच असलेल्या टाके हर्ष गावात हा प्रकार घडला. कौटुंबिक सुख मिळत नसल्याचे सांगणाऱ्या मोखाडा तालुक्यातील काशीनाथ आणि गोविंद पुना दोरे यांनी बच्चीबाई नारायण खडके या मांत्रिकेच्या सांगण्यावरून स्वत:च्या जन्मदात्या आईचा बळी दिला होता. दोरे यांची बहीण पळण्यात यशस्वी झाली होती. श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी प्रकरण उघड केल्यानंतर घोटी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत दोन्ही भावांना ताब्यात घेतले होते. त्यांनी आईचा बळी कसा दिला आणि कोणत्या ठिकाणी तिचे दफन केले हे पोलिसांना दाखविल्यानंतर उत्खनन करण्यात आले. तेथे दोन महिलांचे मृतदेह मिळाले. (वार्ताहर)काशीबाई भिवा वीर या महिलेस भुताळीण ठरवून आधी तिचा बळी देण्यात आला. तिचा मृतदेह एका मोठ्या खड्ड्यात टाकल्यानंतर तो न बुजवता दुसऱ्या दिवशी बुधीबाई पुना दोरे यांचा बळी देण्यात आला. बच्चीबाई खडके हिच्यासह हरी बुधा निरगुडे, लक्ष्मण बुधा निरगुडे, नारायण भिवा खडके, वामन हनुमंता निरगुडे, किसन बुधा निरगुडे, गोविंद पुनाजी दोरे, महादू कृष्णा वीर, बुगीबाई महादू वीर व काशीनाथ पुनाजी दोरे या दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.