शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मरिन ड्राइव्ह परेडवरून मानापमान!

By admin | Updated: December 4, 2014 03:10 IST

महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्यावर्षी पहिल्यांदाच मरिन ड्राइव्हवर प्रजासत्ताक दिनाची परेड झाली. या परेडने राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

अतुल कुलकर्णी, मुंबई महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्यावर्षी पहिल्यांदाच मरिन ड्राइव्हवर प्रजासत्ताक दिनाची परेड झाली. या परेडने राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. न भुतो न भविष्यती असा हा सोहळा दरवर्षी घेतला जाईल, असे जाहीर केले गेले़ मात्र देशभक्तीपेक्षा परेडचे नेतृत्व कोणी करायचे, यावरून पुन्हा पडद्याआड वाद रंगला आहे.दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड शिवाजी पार्कवर होत असे. गेल्यावर्षी तत्कालीन राजशिष्ठाचार मंत्री सुरेश शेट्टी यांनी ही परेड मरिन ड्राइव्हवर घेण्याचे ठरवले. त्यासाठी नागपूर अधिवेशनावेळी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली गेली. त्यात सर्व नेत्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत नेला व शिवाजी पार्कवरील परेड दरवर्षी मरिन ड्राइव्हवर घेण्याचा निर्णय घेतला गेला. गेल्यावर्षी पडद्याआडून जो मुद्दा उपस्थित केला गेला तोच याहीवेळी पुढे आणला गेला आहे. राज्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व महाराष्ट्र पोलिसांनी करावे, असा आग्रह पोलिसांनी गेल्यावर्षी धरला होता. मात्र आर्मी जर त्यात सहभागी होणार असेल तर आपसूक परेडचे नेतृत्व आर्मीकडेच जाते. गेल्यावर्षी परेडचे नेतृत्व आर्मीचे लेफ्टनंट कर्नल विश्वास परांजपे यांनी केले होते. याहीवर्षी पुन्हा पोलिसांना परेड नेतृत्वाचा विषय देशभक्तीपेक्षा जास्त महत्त्वाचा वाटू लागला आहे. मरिन ड्राइव्हवर खूप ठिकाणाहून रस्ते येतात, वाहतूक बंद करावी लागते, सुरक्षेचे प्रश्न आहेत असे मुद्दे उपस्थित करीत ही परेड शिवाजी पार्कवर करावी, असा अहवाल पोलिसांनी गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. > मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार ?गेल्यावर्षीच्या भव्य परेडमध्ये बोफोर्स तोफांपासून ते वायूदल, नौसेना आणि लष्कर तोफा, रणगाडे यांच्यासह त्यात सहभागी झाले. शिवाय शासनाच्या विविध विभागांनी आपापले चित्ररथ देखील तयार केले होते. त्यातून जनतेला देशभक्तीची अनोखी मिसाल अनुभवण्यास मिळाली होती. ही परेड पाहण्यासाठी कोण येणार, असा सवाल उपस्थित करणाऱ्यांची तोंडे मरिन ड्राइव्हवर उसळलेली गर्दी पाहून बंद पडली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.