शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण संस्थेची नोंदणी बंधनकारक

By admin | Updated: June 22, 2014 01:03 IST

इमारत बांधून पूर्ण झाल्यावर आणि त्यातील कमीतकमी दहा गाळे विकल्यावर बिल्डरने सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून तिची नोंदणी सहकार खात्याकडे करणे बंधनकारक आहे.

शासनाची मानीव अभिहस्तांतरण मोहीम : गाळेधारकांना जमिनीचे कायदेशीर हक्कनागपूर : इमारत बांधून पूर्ण झाल्यावर आणि त्यातील कमीतकमी दहा गाळे विकल्यावर बिल्डरने सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून तिची नोंदणी सहकार खात्याकडे करणे बंधनकारक आहे. शासनाने १ मे २०१४ पासून आॅनलाईन नोंदणी सुरू केली आहे. पण नागपूर जिल्ह्यात एकही संस्थेची नोंद झालेली नाही. संस्था रजिस्टर झाल्याच्या तारखेपासून चार महिन्यांच्या आत तिच्या नावे इमारत आणि ती ज्या जमिनीच्या तुकड्यावर उभी आहे तो तुकडा यांची मालकी करून दिली पाहिजे, अशी तरतूद आहे. इमारतीखालील जमीन गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची होत नाही, तोपर्यंत वाढलेले चटईक्षेत्र निर्देशांक, इमारतीची पुनर्बांधणी इत्यादीसाठी संस्थेला विकासकावर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते. बिल्डरने अशी सोसायटी स्थापन करून ती रजिस्टर केली नाही तरी मोफा कायद्यात संबंधित इमारतीतील किमान ६० टक्के गाळेधारक एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करू शकतात आणि अशाप्रकारे अनेक सोसायट्या स्थापनही झाल्या आहेत. बिल्डरच्या सहकार्याविना हाऊसिंग सोसायटी स्थापन करता येणे शक्य आहे. मानीव अभिहस्तांतरण मोहीमसहकारी गृहनिर्माण संस्थेला जमिनीचा मालकी हक्क प्राप्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेएन्स) मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत इमारत संस्थेची, जमिनीची मालकीदेखील संस्थेचीच, यानुसार संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांना विकासकाकडून जमिनीचे कायदेशीर हक्क प्रदान करण्याचा उद्देश आहे. गृहनिर्माण संस्था ज्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत, त्या ठिकाणी सदर संस्थेला मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा लागतो. बिल्डर-प्रमोटर्स सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यास सहकार्य करीत नसेल तर त्यावेळी बिल्डर-प्रमोटर्स व नियोजित संस्थेचे मुख्य प्रवर्तक (गाळेधारकांपैकी) यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी दिली जाते. त्यानंतरच नोंदणी अधिकारी अशा प्रस्तावावर निर्णय देतात.बिल्डरच्या सहकार्याविना संस्थेच्या नोंदणी प्रकरणामध्ये जागेचे व बांधकामाच्या संदर्भात अशी कागदपत्रे उपलब्ध होत नसल्यास, सदरची कागदपत्रे नोंदणी प्रकरणात सादर करण्याची आवश्यकता नाही. जागेबाबत बिल्डर-प्रमोटर्स यांच्याशी केलेल्या करारनाम्यातील प्रत गृहित धरण्यात येते. तसेच नगरपालिकेने किंवा महानगरपालिकेने गाळे वापरासाठी दिलेला दाखला तसेच कर आकारणीच्या पावत्या मुख्य प्रवतर्कांना सादर करण्याचे धोरण महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्थांचे निबंधक पुणे यांनी निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)