शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

माणसाने माणसासारखेच वागावे - उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

By admin | Updated: September 23, 2014 12:24 IST

राज्यात सत्ता आणण्यासाठी महायुतीचे घोडे उधळले असून त्यांना अडवणे अशक्य आहे. मात्र जोपर्यंत घोडे जमिनीवरुन चालत नाही तोपर्यंत त्याचा काडीचाही उपयोग नाही असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ - जागावाटपावरुन शिवसेना - भाजप युतीमधील संबंध ताणलेले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.  राज्यात सत्ता आणण्यासाठी महायुतीचे घोडे उधळले असून त्यांना अडवणे अशक्य आहे. मात्र जोपर्यंत घोडे जमिनीवरुन चालत नाही तोपर्यंत त्याचा काडीचाही उपयोग नाही असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला आहे. महायुतीचे कोडे सुटावे यासाठी माणसाने माणसासारखे वागावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीवरुन प्रसारमाध्यमांवर टीकास्त्र सोडतानाच भाजपला चिमटा काढला आहे. युती तुटणार की राहणार यावर सट्टा लावला जात आहे. यात प्रसारमाध्यमंही सामील झाल्याचे दिसत असून प्रसारमाध्यमांनी युतीपुढे प्रश्नचिन्ह टाकून गोंधळात भर टाकली आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते. त्याचपद्धतीने युती तुटली हीच बातमी होऊ शकते असे प्रसारमाध्यमांना वाटते. त्यामुळे युती तुटावी असे डोहाळे जेवण काही मंडळींनी घातले आहे असा टोलाही ठाकरेंनी लगावला आहे. महायुतीचे कोडे लवकर सुटणे गरजेचे आहे व त्यासाठी माणसाने माणसासारखेच वागावे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.