Mayoral Election: राज्यातील ९ शहरांना मिळाले नवे कारभारी; नागपूरसह ८ ठिकाणी भाजपचा महापौर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 09:02 IST2026-02-07T09:00:35+5:302026-02-07T09:02:00+5:30

राज्यातील ९ महापालिकांमध्ये शुक्रवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात नागपूरसह ८ शहरांत सत्ताधारी भाजप, तर एका महापालिकेत राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) महापौर खुर्चीत बसला आहे.

Mahayuti Sweeps Mayoral Polls: BJP Claims 8 Corporations, NCP (Ajit Pawar) Wins 1 | Mayoral Election: राज्यातील ९ शहरांना मिळाले नवे कारभारी; नागपूरसह ८ ठिकाणी भाजपचा महापौर!

Mayoral Election: राज्यातील ९ शहरांना मिळाले नवे कारभारी; नागपूरसह ८ ठिकाणी भाजपचा महापौर!

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यातील ९ महापालिकांमध्ये शुक्रवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात नागपूरसह ८ शहरांत सत्ताधारी भाजप, तर एका महापालिकेत  राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) महापौर खुर्चीत बसला आहे. विशेष म्हणजे ५ महापालिकांत महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडले गेले.  

या निवडणुकांमध्ये एमआयएमची भूमिका चर्चेत राहिली. अमरावतीत एमआयएमच्या  एका  नगरसेविकेने महायुतीच्या उमेदवारांना मत दिले, तर उर्वरित ११ नगरसेवकांनी तटस्थ राहणे पसंत केले. नागपुरात एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. नागपुरात एमआयएमचे सहा नगरसेवक आहेत. सोलापुरात एमआयएमने अर्ज मागे घेतल्याने तिथे बिनविरोध निवड झाली. 

महापालिका: महापौर आणि उपमहापौर यादी

महापालिकामहापौरउपमहापौर
पिंपरी-चिंचवडरवी लांडगे (भाजप)शर्मिला बाबर (भाजप)
सोलापूरविनायक कोंड्याल (भाजप)ज्ञानेश्वरी देवकर (भाजप)
नाशिकहिमगौरी आडके (भाजप)विलास शिंदे (शिंदेसेना)
जळगावदीपमाला काळे (भाजप)मनोज चौधरी (शिंदेसेना)
अहिल्यानगरज्योती गाडे (राष्ट्रवादी अजित पवार)धनंजय जाधव (भाजप)
कोल्हापूररूपाराणी निकम (भाजप)अक्षय जरग (जनसुराज्य)
नागपूरनीता ठाकरे (भाजप)लीला हाथीबेड (भाजप)
अमरावतीश्रीचंद तेजवानी (भाजप)सचिन भेंडे (युवा स्वाभिमान)
धुळेमाया परदेशी (भाजप)ज्योत्स्ना पाटील (भाजप)

Web Title : महाराष्ट्र के 9 शहरों में महापौर चुनाव में भाजपा का दबदबा

Web Summary : महाराष्ट्र के 9 शहरों में से 8 में भाजपा ने महापौर पद हासिल किए, जिनमें नागपुर भी शामिल है। एनसीपी (अजित पवार गुट) ने एक में जीत हासिल की। एमआईएम की भूमिका अलग-अलग रही, अमरावती में गठबंधन का समर्थन किया लेकिन नागपुर में तटस्थ रही। कई चुनाव निर्विरोध हुए।

Web Title : BJP Dominates Mayoral Elections in Maharashtra's 9 Cities

Web Summary : BJP secured mayoral positions in 8 of 9 Maharashtra cities, including Nagpur. NCP (Ajit Pawar faction) won in one. MIM's role varied, supporting the alliance in Amravati but remaining neutral in Nagpur. Several elections were unopposed.