हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

By अजित मांडके | Published: March 16, 2024 02:06 PM2024-03-16T14:06:55+5:302024-03-16T14:07:20+5:30

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

Maharashtra's Nationalist Congress and Shiv Sena formed the government by splitting the money received from installments: Rahul Gandhi | हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना काळात वॅक्सिंग बनवणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपये हप्त्याच्या स्वरूपात घेतले असा घनगती आरोप राहुल गांधी यांनी ठाण्यातल्या चिंतामणी चौकातील सभेत करत या हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच राज्य सरकार पाडत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली असा आरोप देखील राहुल गांधी यांनी ठाण्यात केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. भाजप आणि आरएसएस हे व्यक्ती व्यक्तीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. असा आरोप त्यांनी केला. मी एक वर्षांपूर्वी भारत जोडो यात्रा केली होती. ही देशाला  जोडणारी यात्रा होती. मात्र भाजपा आणि  आर एस एस चे लोक देशातील नागरिकांमध्ये  एकमेकांशी भांडण लावण्याचे काम करत आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. हे दोघे मिळून २४ तास देशाला कमजोर करत आहेत. असा असा आरोप ही गांधी यांनी त्यांच्या भाषणातून केला. इलेक्टरॉल बॉण्ड च्या माध्यमातून भाजपला कंपन्या करोडो रुपये देते असे ते म्हणाले. आधी  कंपन्यावर केंद्र सरकार ईडी इन्कम टॅक्स यांना मागे लावते. त्यानंतर या कंपन्यांनी भाजप पक्षाच्या खात्यात पैसे दिल्यावर मग चोकशी थंड होते. काही लोकांना मोठे कंत्राट दिले जाते. ते देण्यापूर्वी जे लोक हे कंत्राट मिळवण्यासाठी रांगेत असतात ते  पैसे देतात. मग त्यांना कंत्राट मिळते असा दावा त्यांनी केला.

नरेंद्र मोदींनी इलेक्टरॉल बॉण्ड च्या माध्यमातून सामान्य जनतेचा पैसा घेतला आहे. प्रभू के गुण गायो आधी रोटी खायो ओर मर जाओ. असा टोला ही त्यांनी लगावला. जनतेचे पैसे २४ तास मोदी लुटत आहे. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तराचे खंडणी सत्र सुरु केले आहे. हिंदुस्थान मध्ये ५० लाख करोनाने मेले. पण हे लोकांना माहिती नाही. जेव्हा कोरोनाने लोकांचे मृतदेह साचत होते. तेव्हा व्हॅक्सीन वाली कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पक्षाला पैसे देत होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला. एकीकडे जनता थाळ्या वाजवत होते आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे पैसे काढत होते. मात्र याबाबत जे बोलतात त्यांच्या मागे अमित शहा ईडी इन्कम टॅक्स ची चोकशी लावतात. आज जे आमदार भाजपत पळाले या सर्वांना नरेंद्र मोदींनी पैसे देऊन फिट केले. हे लोक हफ्ते घेतात आणि सरकार तोडतात. महाराष्ट्र गोवात त्यांनी हेच केले. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आयोध्येत उभ राहिलेल्या राम मंदिराच्या उदघाट्नाला  एकही गरीब व्यक्ती उपस्थितीत नव्हता. देशाच्या राष्ट्र्पतीना ही त्यांनी सांगितले की उदघाटनाला तुम्ही येऊ शकत नाही. फक्त दोन ते तीन टक्के लोकांना या मंदिराच्या उदघाटनाचे आमंत्रण होते.

आज अदानी म्हणजेच नरेंद्र मोदी आहे आणि मोदी म्हणजे अदानी अशी टीकाही त्यांनी केली.  नफरत के इस बाजार मे आप लोगो ने मोहब्बत की दुकान खोली. असे सांगत राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणाचे शेवट केला. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत ठाण्याचे खासदार राजन विचारे, कळवा मुंब्रा मतदारसंघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थितीत होते.

Web Title: Maharashtra's Nationalist Congress and Shiv Sena formed the government by splitting the money received from installments: Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.