शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवस महाराष्ट्राचा!

By admin | Updated: February 14, 2016 01:47 IST

मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील कृषी व ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री

मुंबई : मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील कृषी व ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोका-कोला, रेमंड आणि ट्विन स्टार या कंपन्यांसोबत करार करण्यात आले. विदर्भातील संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या करारामुळे दिलासा मिळणार आहे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पसंतीचे ठिकाण असल्याची अनुभूती मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आली. एमएमआरडीए मैदानावरील महाराष्ट्र पॅव्हेलिअनमध्ये फिनलँड, पोलँड आणि जपानच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन राज्यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी संत्रा ज्युस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज कंपनी, जैन इरिगेशन कंपनी आणि राज्य शासनाचा कृषी व पणन विभाग यांच्यात करार झाला. या करारानुसार, विदर्भात संत्रा व मोसंबी रस प्रक्रिया आणि त्याचा रस बाटलीबंद करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी होणार असून, लोकांना नवीन रोजगार मिळणार आहे. ५ हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. तर, रेमंड इंडस्ट्री आणि राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात दुसरा सामंजस्य करार झाला. फार्म टू फॅब्रिक धोरणानुसार हा करार करण्यात आला आहे. या करारनुसार रेमंड उद्योगसमूह लिनन व फॅब्रिक्स् कापडाच्या उत्पादनासाठी १४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. राज्यात एलसीडी उत्पादनासंदर्भाथ राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि ट्विन स्टार (स्टरलाइन कंपनी) यांच्यात तिसरा सामंजस्य करार झाला. ट्विन स्टार कंपनी ही तैवानच्या ओट्रॉन या कंपनीसोबत तांत्रिक सहकार्य करून हा प्रकल्प उभारणार असून, सुमारे २० हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात होणार आहे.- महाराष्ट्र हे देशाचे फ्रुट बास्केट असून, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पोलंडने राज्यात गुंतवणूक करावी. तसेच ‘२०१७ हे महाराष्ट्र भेट वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे, यात पोलंडने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलंडचे पहिले उपपंतप्रधान प्रा. ग्लिन्स्की यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला केले. तर, फिनलँडचे पंतप्रधान जुहा सिपीला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण, आरोग्य, सौरऊर्जा या क्षेत्रात राज्यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.