शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

...तर महाराष्ट्राचा अफगाण होईल!

By admin | Updated: October 2, 2015 04:21 IST

सनातन संस्थेत मानवी बॉम्ब तयार केले जात असून त्यांना रोखले नाही, तर लवकरच महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव

मुंबई : सनातन संस्थेत मानवी बॉम्ब तयार केले जात असून त्यांना रोखले नाही, तर लवकरच महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी गुरुवारी व्यक्त केली.मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मानव यांनी, सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आधार घेत सनातनवर गंभीर आरोप केले. सनातनविरोधात असलेल्या पोलीस, पुरोगामी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते हे पाताळातील सैतान असल्याची भावना साधकांमध्ये रुजवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. सनातनच्या आश्रमांमध्ये टप्प्याटप्प्याने साधकांचे ब्रेनवॉश करून सर्व प्रकार घडवले जात आहेत. डॉ. जयंत आठवले यांनी १९८३ साली लिहिलेल्या ‘क्लिनिकल हिप्नोसिस’ या पुस्तकात आठवले यांनी हॅल्युसिनेशन्स प्रकारात व्यक्तीला वेगवेगळे भास निर्माण करता येतात, असा दावा केला आहे. शिवाय संमोहित करण्याच्या प्रकारात एखाद्या व्यक्तीच्या हातून हवी तशी घटना घडवली जाते. मात्र ती घटना केल्यानंतर संबंधित व्यक्ती पकडली गेली, तर जीव जाईपर्यंत मारहाण केली तरी ती व्यक्ती काय केले? कसे केले? कुठे केले? आणि कोणाच्या सांगण्यावरून केले? हे सांगू शकत नाही. कारण त्या व्यक्तीला काहीच आठवत नाही.हे ध्यानी घेता डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडले, तरी त्यांचे ब्रेनवॉश केल्याची शक्यता असल्याने कबुलीजबाब मिळणे कठीण असल्याचा दावाही त्यांनी केला.आश्रमात गैरकृत्ये नाहीत -सनातनचा दावापणजी : सनातनच्या रामनाथी आश्रमात कोणत्याही गैरकृत्ये होत नाहीत. त्यामुळे आश्रम हटविण्याचा प्रश्नच येत नाही, असे सनातन संस्थेच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने श्रीराम सेनेवर घातलेली बंदी चुकीची असल्याचे मत सनातन प्रभातचे माजी समूह संपादक दुर्गेश सामंत, हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक मनोज सोळंकी, महेश पारकर यांनी पत्रकार परिषद व्यक्त केले. रामनाथ युवा संघाने हा आश्रम हटविण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली असून अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोप खोडून काढण्यासाठी ही पत्रकार परिषद होती.——————अहवालानंतरच निर्णय - पार्सेकरसनातन संस्थेबाबत अगोदर महाराष्ट्राच्या गृह खात्याचा अहवाल येऊ द्या. त्या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतरच त्या विषयी गोवा सरकार काय ती पाऊले उचलू शकेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी सांगितले.राजभवनवर राजेंद्र आर्लेकर यांचा मंत्रीपदी शपथविधी पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सनातन ही दहशतवादी संघटना असल्याचे तुम्हाला वाटते काय, असे पत्रकारांनी विचारले असता, आम्हाला तसा अनुभव आलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र माझे व्यक्तिगत मत काहीही असले, तरी महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून कोणते निष्कर्ष काढले जातात, ते पाहावे लागेल.