Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 09:35 IST2025-07-05T09:33:52+5:302025-07-05T09:35:09+5:30

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात आज, ५ जुलै रोजी काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

maharashtra weather update heavy rain alert july 5 Heavy rains expected in Mumbai, Thane; Orange alert issued for 'these' districts including Ratnagiri, Raigad today | Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात आज, ५ जुलै रोजी काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून, यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाचा अंदाज
राज्याची राजधानी मुंबई आणि शेजारच्या ठाण्यात आज पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात जोरदार पावसाचा इशारा
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थिती
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर, विशेषतः पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातही आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया आणि भंडारा या प्रमुख शहरांसह अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मान्सून सक्रिय राहणार असून, नागरिकांनी हवामानानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: maharashtra weather update heavy rain alert july 5 Heavy rains expected in Mumbai, Thane; Orange alert issued for 'these' districts including Ratnagiri, Raigad today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.