शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

महाराष्ट्र निवडणूक 2019: कुणाचंही नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात; शिवसेनेनं वाढवला भाजपावरचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 2:50 PM

Maharashtra Election Result 2019: भाजपा, शिवसेनेकडून दबावाचं राजकारण जोरात

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठवडा होऊनही अद्याप महायुतीला सरकार स्थापन करण्यात अपयश आलं. काही दिवसांपासून शिवसेना, भाजपामध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या माध्यमातून एकमेकांना दबाव आणल्यानंतर आता सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कुणाचंही नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात असल्याचं म्हणत भाजपावरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांची बैठक घेतल्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. आज शिवसेना भवनात पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. त्यात उद्धव ठाकरेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी दिवशी केलेल्या विधानावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी दिवशी जे विधान मुख्यमंत्र्यांनी केलं, ते योग्य नाही. तसं विधान त्यांनी करायला नको होतं. भाजपाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करणार असून, आम्ही मित्र पक्षाला शत्रू मानत नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख झाला नव्हता, असं फडणवीस यांनी केलं होतं. हे विधान उद्धव ठाकरेंनी फारसं रुचलेलं नाही.आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झाली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. दिंडोशीचे आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सुनील प्रभू यांचीही पुन्हा पक्षाचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर शिवसेनेचे आमदार राज्यपाल्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. राज्यात अनेक भागांत अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी राज्यपालांनी राज्याचा दौरा करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून केली जाणार आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत