शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:54 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. काल निवडणूक अधिकाऱ्यांनी  वणी येथील सभेपूर्वी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केली. आज दुसऱ्या दिवशीही ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी औसा येथे केली, यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची देखील बॅग तपासण्याचे आव्हान दिलं.

"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औसा येथे जाहीर सभा घेतली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  या सभेपूर्वी सलग दुसऱ्या दुवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅग तपासली. कालही ठाकरे यांची बॅग तपासली होती,  राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप झाले. आज औसा येथील ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 'मला शिंदे फडणवीस यांच्या सांगण्यावरुन चेकिंगवर टाकल असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. "माझी बॅग तुझ्याकडेच देतो, ती घेऊन येत जा. फक्त त्यातील कपडे चोरु नकोस, असा निशाणाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, बॅग तपासायला हरकत नाही, माझं मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ आहे. माझी बॅग तपासल्याबद्दल माझा आक्षेप नाही, मी आजही त्यांना विचारलं तुम्ही आतापर्यंत किती जणांच्या बॅगा तपासल्या, त्यावेळी ते म्हणाले तुमचीच पहिली बॅग तपसाली आहे. उद्धव ठाकरेंची बॅग त्यांनी ऑटोचेकींगवर ठेवली आहे. मी तर म्हणतो माझी बॅग तुझ्याकडेच देतो, रोज घेऊन ये. फक्त एक काम करायचे माझा पक्ष चोरला तसा माझी कपडे चोरायची नाहीत. कारण चोर तो चोरच असतो. एकदा का चोरीची सवय लागली की चोरी मारी करुन जगायची सवय लागते, असा टोलाही ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. 

अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरेंनी टीका केली

"माझी बॅग तपासल्यानंतर औसावरुन इकडे यायला तयार झालो. हेलिकॉप्टरमध्ये बसलो, पण हेलिकॉप्टर उडायला तयार नाही. मी कारण विचारले तर त्यांनी सांगितले की मोदीजी सोलापूरला येत आहेत ते पोहोचल्याशिवाय आपल्याला उड्डान करता येणार नाही. म्हणजे ही कुठली बेबंदशाही आहे, हीच लोकशाहीची थट्टा सुरु आहे. मोदींनी पंतप्रधानावरुन खाली उतरायला पाहिजे. मी जसा माझ्या पक्षाचा स्टार प्रचारक आहे, तसे तेही त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे मला जो कायदा आहे तो त्यांनाही लागू असायला पाहिजे, सगळ्या यंत्रणा त्यांनी गुलाम केल्या आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेElectionनिवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी