शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

... तर कोरोनाबाधितांनाच घेऊन मातोश्रीवर काढणार मोर्चा; सदाभाऊ खोत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 19:16 IST

Coronavirus : साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी दिला इशारा. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ.

ठळक मुद्दे साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी दिला इशारा.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात रेमडेसिवीरसारख्या औषधांचाही तुडवडा होत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, "रेमडेसिवीर औषध कंपन्यांची राज्य सरकारने मुस्कटदाबी केल्याने महाराष्ट्रात  इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या दोन दिवसात राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीचा निर्णय घेऊन पुरवठा सुरळीत केला नाही तर मंगळवार २० एप्रिल रोजी कोरोनाबाधित आणि त्यांच्या नातेवाईकांना सोबत घेऊन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मोर्चा काढणार आहोत," असा इशारा माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "एका बाजूला राज्यात  रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण केल्याने नागरिकांचं बळी जात आहे. दुसऱ्या बाजूला औषध विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांना रेमडीसिवर खरेदीत केवळ कमीशन खायचे असल्याने खरेदी थांबवली गेली आहे. कंपन्यांनी इंजेक्शन केवळ राज्य सरकारलाच विकायचे असा फतवा सरकारने काढला आहे. त्यामुळे कंपन्यांना ते इंजेक्शन मेडिकल दुकानदारांना थेट विकता येत नाही व परिणामी सर्वसामान्य नागरिकांना देखील मिळू शकत नाही," असं खोत यावेळी म्हणाले. 

... तर मोर्चाही काढणार"ही बाब अतिशय संतापजनक असून सरकारने स्वतः तात्काळ इंजेक्शन खरेदी करावी व खासगी मेडिकल दुकानदारांनाही विकण्याची मुभा कंपन्यांना द्यावी. जेणेकरून रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र, सरकार केवळ कमीशन आणि खंडणीसाठी सर्वसामान्य जनतेचे जीव घेणार असेल तर रयत क्रांती संघटना औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे पुतळे तर जाळणारच आहे. त्याच बरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर कोरोनाग्रस्त व नातेवाईकांना सोबत घेऊन मोर्चाही काढेल," असा इशारा खोत यांनी दिला. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत corona virusकोरोना वायरस बातम्याChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेhospitalहॉस्पिटल