शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
3
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
4
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
5
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
6
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
7
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
8
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
9
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
10
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
11
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
12
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
13
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
14
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
15
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
16
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
17
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
18
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
19
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
20
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात AIMIM ची जोरदार मुसंडी, ९५ नगरसेवक विजयी; कुठल्या महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:45 IST

सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये एमआयएमचे प्रत्येकी ८ असे २४ नगरसेवक निवडून आले आहेत

मुंबई -राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र या निकालांमध्ये असदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएमच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये ९५ हून अधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात मुंबईत ४ जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात मानखुर्द-गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. त्यामुळे मुंबईत काँग्रेससह सपासाठी हा मोठा धक्का मानला जातो. मुंबईतील मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात औवेसी यांची जादू चालल्याचे दिसून येते. 

सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये एमआयएमचे प्रत्येकी ८ असे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. अमरावती महापालिकेत ६, ठाण्यात ५, नागपूरात ४ ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील २९ पैकी १३ महापालिकांत एमआयएमचे ९५ नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचे सर्वाधिक २४ नगरसेवक निवडून आले आहेत. मालेगाव महापालिकेत एमआयएमचे २० नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईतही एमआयएमच्या विजयाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात समाजवादी पक्षाला मागे सारत एमआयएमची सरशी झाली आहे.

राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी

मुंबईत काय परिस्थिती?

मुंबई महानगरपालिकेच्या आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने ९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदेसेना २८ जागांवर आघाडीवर आहे. उद्धवसेना ५७ तर मनसेने ९ जागांवर आघाडी घेतली आहे. याशिवाय कांग्रेसने १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ३ तर इतरांनी ८ जागांवर आघाडी घेतली आहे. अखेरच्या टप्प्यामधील १७ जागांचे निकाल येणे बाकी आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये काय चित्र?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने शहरात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५८ जागांच्या आकड्याकडे त्यांची वेगाने वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने २४ जागांवर मुसंडी मारत सर्वांना धक्का दिला आहे. मात्र, शिंदेसेना केवळ १४ जागांवर पुढे आहे. उद्धवसेनेची देखील ६ जागांवर घसरण झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ०४ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी (शप): प्रत्येकी ०१ जागांवर पुढे आहेत.
 

English
हिंदी सारांश
Web Title : AIMIM's Strong Showing in Maharashtra, Wins 95 Corporator Seats

Web Summary : AIMIM secured over 95 corporator seats across Maharashtra's municipal elections, notably in Chhatrapati Sambhajinagar (24) and Malegaon (20). The party's success, especially in Muslim-dominated areas like Mumbai, impacted Samajwadi Party and Congress. BJP leads in Mumbai and Chhatrapati Sambhajinagar.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६Malegaon Municipal Corporation Electionमालेगाव महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन