Maharashtra Election Results 2026: राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:12 IST2026-01-16T15:59:18+5:302026-01-16T16:12:59+5:30

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात मतदानापूर्वी काही ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवड झाली होती. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देत त्यांची यादी जाहीर केली आहे.

Municiple Election Result: 65 candidates became corporators unopposed in the state; BJP has the highest number, Election Commission releases list | Maharashtra Election Results 2026: राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी

Maharashtra Election Results 2026: राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी

मुंबई - राज्यातील २९ महापालिकांचे निकाल आता समोर आले आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या प्रमुख महापालिकांमध्ये भाजपा महायुतीने जोरदार विजय मिळवला आहे. मुंबईत गेल्या २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता पालटत भाजपाने महायुतीने तब्बल १३० जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचा फार मोठा परिणाम दिसून आला नाही. मराठी बहुल भागात उद्धवसेना-मनसेला मिळालेल्या यशामुळे किमान ६५ जागांपर्यंत ठाकरे बंधूंना मजल मारता आली आहे. राज्यात मतदानापूर्वी काही ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवड झाली होती. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देत त्यांची यादी जाहीर केली आहे.

बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक कोण?

पिंपरी चिंचवड महापालिका

प्रभाग ६ ब - रवी लांडगे -  भाजपा
प्रभाग १० ब - सुप्रिया चांदगुडे - भाजपा

भिवंडी निजामपूर महापालिका

प्रभाग क्रमांक १६ अ - परेश चौघुले - भाजपा
प्रभाग क्रमांक १७ ब - सुमित पाटील - भाजपा
प्रभाग क्रमांक १८ अ - अश्विनी फुटाणकर - भाजपा
प्रभाग क्रमांक १८ ब - दीपा मढवी - भाजपा
प्रभाग क्रमांक १८ क - शेख अबुसाद अशफाक अहमद - भाजपा
प्रभाग क्रमांक २३ ब - भारती चौधरी - भाजपा

कल्याण डोंबिवली महापालिका

प्रभाग क्रमांक ११ अ - रेश्मा निचळ  - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक १८ अ - रेखा चौधरी - भाजपा
प्रभाग क्रमांक १९ अ - पूजा म्हात्रे - भाजपा
प्रभाग क्रमांक १९ ब -  सुनिता पाटील - भाजपा
प्रभाग क्रमांक १९ क - साई शेलार - भाजपा
प्रभाग क्रमांक २३ अ - दीपेश म्हात्रे - भाजपा
प्रभाग क्रमांक २३ क -  हर्षदा भोईर - भाजपा
प्रभाग क्रमांक २३ ड - जयेश म्हात्रे - भाजपा
प्रभाग क्रमांक २४ अ - रमेश म्हात्रे - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक २४ ब - ज्योती पाटील - भाजपा
प्रभाग क्रमांक २४ क - वृषाली जोशी -  शिंदेसेना
प्रभाग क्रमांक २४ ड - विश्वनाथ राणे - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक २६ अ - मुकुंद पेडणेकर - भाजपा
प्रभाग क्रमांक २६ ब - रंजना पेणकर - भाजपा
प्रभाग क्रमांक २६ क - आसावरी नवरे - भाजपा
प्रभाग क्रमांक २७ अ - मंदा पाटील - भाजपा
प्रभाग क्रमांक २७ ड - महेश पाटील - भाजपा
प्रभाग क्रमांक २८ अ - हर्षल मोरे - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक २८ ब - ज्योती मराठे - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक ३० ब - रवीना माळी - भाजपा

पनवेल महापालिका 

प्रभाग क्रमांक १८-अ - ममता म्हात्रे - भाजपा
प्रभाग क्रमांक १८ ब - नितीन पाटील - भाजपा
प्रभाग क्रमांक १८ क - स्नेहल ढमाले - अपक्ष
प्रभाग क्रमांक १९ अ - दर्शना भोईर - भाजपा
प्रभाग क्रमांक १९ ब - रुचित लोंढे - भाजपा
प्रभाग क्रमांक २० अ - अजय बहिरा - भाजपा 
प्रभाग क्रमांक २० ब -प्रियंका कांडपीळे - भाजपा 

जळगाव महापालिका 

प्रभाग क्रमांक २ अ – सोनवणे सागर रामकांत – शिंदेसेना
प्रभाग क्रमांक ७ अ – काळे दिपाली मनोज – भाजपा
प्रभाग क्रमांक ७ ब – पाटील अंकिता पंकज – भाजपा
प्रभाग क्रमांक ७ क – विशाल सुरेश (राजूभामा) भोळे – भाजपा
प्रभाग क्रमांक ९ अ – चौधरी मनोज सुरेश – शिंदेसेना
प्रभाग क्रमांक  ९ ब – देशमुख प्रतिमा गजानन – शिंदेसेना
प्रभाग क्रमांक १२ ब – बेंडाळे उज्वला मोहन (किरण) – भाजपा
प्रभाग क्रमांक १३ क – पाटील केशरी अमित – भाजपा
प्रभाग क्रमांक १६ अ – विश्वास सुरेश खडके – भाजपा
प्रभाग क्रमांक १८ अ – डॉ. सोनवणे गौरव चंद्रकांत – शिंदेसेना
प्रभाग क्रमांक १९ अ  पाटील रेखा उदयन – शिंदेसेना
प्रभाग क्रमांक १९ ब – सोनवणे विक्रम किशन – शिंदेसेना

पुणे महापालिका 

प्रभाग क्रमांक  ३५ ब – मंजुषा दीपक नागपुर – भाजपा
प्रभाग क्रमांक ३५ ड – श्रीकांत शशिकांत जगताप – भाजपा 

मालेगाव महापालिका 

प्रभाग कमांक ६ क  - मुनिरा शेख फकीर महंमद - इंडियन सेक्युलर लार्जेस्ट अँसेंब्ली ऑफ महाराष्ट्र

धुळे महापालिका 

प्रभाग क्रमांक १ अ - उज्वला रणजित भोसले - भाजपा
प्रभाग क्रमांक ६ ब पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल - भाजपा
प्रभाग क्रमांक १७ अ - मासुळे अमोल पावबा - भाजपा
प्रभाग क्रमांक १७ ब - सुरेखा उगले - भाजपा

ठाणे महापालिका 

प्रभाग क्रमांक ५ अ चव्हाण सुलेखा सुधाकर - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक १४ अ ढमाले शितल संतोष - शिंदेसेना 
प्रभाग क्रमांक १७ अ - एकनाथ भोईर - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक १८ ब - जयश्री फाटक - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक १८ क - सुखदा मोरे - शिंदेसेना
प्रभाग क्रमांक १८ ड - राम रेपाळे - शिंदेसेना

अहिल्यानगर महापालिका 

प्रभाग क्रमांक ६ ब - सोनाबाई शिंदे - भाजपा
प्रभाग क्रमांक ६ ड - करण कराळे - भाजपा
प्रभाग क्रमांक ७ ब - पुष्पा बोरुडे - भाजपा
प्रभाग क्रमांक ८ ड - कुमार वाकळे - राष्ट्रवादी अजित पवार
प्रभाग क्रमांक १४ अ - प्रकाश भागानगरे - राष्ट्रवादी अजित पवार
 

Web Title : महाराष्ट्र: 65 उम्मीदवार निर्विरोध पार्षद निर्वाचित; भाजपा सबसे आगे

Web Summary : महाराष्ट्र में, चुनाव से पहले 65 उम्मीदवार निर्विरोध पार्षद चुने गए। भाजपा ने सबसे अधिक सीटें हासिल कीं। राज्य चुनाव आयोग ने सूची जारी कर दी है।

Web Title : Maharashtra: 65 Candidates Elected Unopposed as Corporators; BJP Leads

Web Summary : In Maharashtra, 65 candidates were elected unopposed as corporators before elections. BJP secured the most seats. The State Election Commission has released the list.