शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

CoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 10:05 PM

CoronaVirus News : राज्यात २४ तासांत ३४ हजार ३८९ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच याच कालावधीत राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ५९ हजार ३१८ जण बरे झाले.

ठळक मुद्देराज्यात कोरोनामुळे २४ तासांत ९८४ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या ४ लाख ६८ हजार १०९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोना व्हारसची दुसरी लाट हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात रविवारी रुग्ण बरे होणाऱ्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र ही बाब दिलासादायक असली तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. आज ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर राज्यात आज कोरोनाच्या ३४ हजार ३८९ नवीन रुग्णाांचे निदान झाले आहे. तर, ९७४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. (Maharashtra reports 34,389 new COVID19 cases, 59,318 discharges and 974 deaths in the last 24 hours)

राज्यात २४ तासांत ३४ हजार ३८९ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच याच कालावधीत राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ५९ हजार ३१८ जण बरे झाले. राज्यात कोरोनामुळे २४ तासांत ९८४ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या ४ लाख ६८ हजार १०९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

याचबरोबर, महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ५३ लाख ७८ हजार ४५२ कोरोनाबाधितांपैकी ४८ लाख २६ हजार ३७१ जण बरे झाले. यामुळे राज्याचा कोरोना रुग्ण बर होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८९.७४ टक्के झाला. कोरोनामुळे राज्यात ८१ हजार ४८६ मृत्यू झाले. तसेच कोरोना झालेल्यांपैकी २ हजार ४८६ जणांचा इतर काराणांमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्याचा कोरोना मृत्यू दर १.५२ टक्के झाला आहे.

(कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी)

आतापर्यंत महाराष्ट्रात ३ कोटी ११ लाख ३ हजार ९९१ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ५३ लाख ७८ हजार ४५२ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १७.२९ टक्के आहे. सध्या राज्यात ३४ लाख ९१ हजार ९८१ जण होम क्वारंटाइन तर २८ हजार ३९८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

(CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा)

कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार,सज्ज राहा - उद्धव ठाकरेमहाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत मैदानात उतरण्याचे आवाहन केले. कोरोनावर अजूनही हमखास औषध आपल्याकडे नाही. कोविडच्या सुरुवातीच्या काळात  डॉक्टरांमध्ये, सर्वसामान्य माणसांच्या मनात कोविडची प्रचंड दहशत होती, आपल्याला हे कोविडचे युद्ध किती मोठी आणि भयानाक आहे हे जाणवू लागले होते. आपण यावर न डगमगता पाऊले टाकली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र