CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 07:36 PM2021-05-16T19:36:46+5:302021-05-16T19:42:23+5:30

CoronaVirus News : कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे.

covaxin effective against coronas strains found in britain and india, bharat biotech | CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

Next

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेमुळे (Second Wave) हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी भयानक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचे नवे स्ट्रेन (प्रकार) आढळून येत असल्यामुळे चिंता वाढली आहे. यातच लस निर्मिती कंपनी असलेल्या भारत बायोटेकने मोठा दावा केला आहे. कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. (covaxin effective against coronas strains found in britain and india, bharat biotech)

भारतातील B.1.617 आणि ब्रिटनमधील B.1.1.7 या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावीपणे मात करत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संशोधन विभाग यांच्या माध्यमातून या स्ट्रेनवर सखोल अभ्यास केला. तसेच, कोव्हॅक्सिनचा वापर B.1.1.7 स्ट्रेन आणि व्हॅक्सिन स्ट्रेन (D614G)च्या न्यूट्रिलायझेशनध्ये काही बदल दिसून आला नसल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या सह संस्थापक सुचित्रा इला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी हे ट्विट पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना टॅग केले आहे.

2 ते 18 वयोगटावर कोव्हॅक्सिनची चाचणी
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 2 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. कोव्हॅक्सिनची दुसरी आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास डीसीजीआयने परवानगी दिली आहे. त्यानुसार 525 स्वयंसेवकावर चाचणी होणार आहे. त्यामुळे 2 ते 18 वयोगटासाठी कोरोना लसीकरण दृष्टीपथात आल्याचे मानले जाते. सध्या केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोनाची लस घेण्याची संमती आहे.

(बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण)

देशात तीन लसींचे लसीकरण 
देशात सध्या दोन लसींचे लसीकरण सुरु आहे. सीरम इंस्टीट्यूटद्वारे तयार केलेली कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन लसीचा यामध्ये समावेश आहे. तर रशियाद्वारे निर्मित स्पुटनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ही लस लोकांना दिली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत देशात 18 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

(कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी)

Web Title: covaxin effective against coronas strains found in britain and india, bharat biotech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.