बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 06:55 PM2021-05-16T18:55:57+5:302021-05-16T18:56:42+5:30

CoronaVirus : एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

lucknow villages hit badly by corona second wave around 15 persons died in with covid like symptoms bakshi ka talab | बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

Next
ठळक मुद्देकोरोनासदृश लक्षणांमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक गावात या लक्षणांपासून ग्रस्त आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र अद्याप कोरोना संसर्गाचा धोका टळला नाही. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोरोना स्थिती फारच गंभीर आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे लखनऊमधील एका गावात कहर केला आहे. येथील एकाच गावात गेल्या काही दिवसांत कोरोनासदृश लक्षणांमुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (lucknow villages hit badly by corona second wave around 15 persons died in with covid like symptoms bakshi ka talab)

येथील बख्शीचे तालाबमधील इंदारा गावातील लोकांचा असा दावा आहे की, येथे कोरोनासदृश लक्षणांमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक गावात या लक्षणांपासून ग्रस्त आहेत. इंदारा आणि कुमारवा या गावातही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. आरोग्य विभागाची एकही टीम याठिकाणी टेस्टिंगसाठी आली नाही. तसेच, कोणाही वैद्यकीय किटसुद्धा दिली नाही, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे.

(कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी)

गावात स्वच्छता सुद्धा करण्यात आली नाही. कोरोना आणि कर्फ्यूमुळे लोकांना दुहेरी झटका बसत आहे, असे या गावांमधील लोकांनी म्हटले आहे. इंदारा गावचे शेतकरी अमरेंद्रसिंह भदोरिया यांनी आजतक वृत्तवाहिनीला सांगितले की, त्यांना फेब्रुवारीपासून धान्य दिले जात नाही. या कोरोना साथीमुळे त्यांचे नुकसान होत आहे. सरकारने 72 तासांच्या आत पैसे देण्याचा दावा केला, परंतु 3 महिन्यांनंतरही पैसे दिले गेले नाहीत, असे अमरेंद्रसिंह भदोरिया म्हणाले.

भीतीमुळे कुमरावातील ग्रामस्थ आपली टेस्ट करून घेत नाहीत. कुमरावा गावचे रहिवासी सौरव पांडे म्हणाले की, लोकांना रुग्णालयात दाखल केले जाईल व तेथील परिस्थिती सर्वात वाईट आहे, असे ग्रामस्थांना वाटते.  मात्र, काही जणांचे असे म्हणणे आहे की, त्यांना जो सर्दी-खोकला झाला आहे, तो केवळ व्हायरल आहे. कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही. त्याचबरोबर काही जणांना असे वाटते की, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास गावात त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल. तर काही लोक कोरोना टेस्टिंगची व्यवस्था नसल्याचा आरोप करत आहेत.

30 वर्षीय अनिल, ज्यांचे मिठाईचे दुकान होते. ते कुटुंबातील एकमेव कमाई करणारे सदस्य होते. कोरोनासदृश्य लक्षणे आणि श्वास घेण्यास होत असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अनिल त्याच्या मागे एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी सोडून गेले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अश्रू हे ग्रामीण भागातील प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे सांगत होते. 'दोन दिवसांत अनिल यांना काय झाले? हे समजू शकले नाही. त्यांना औषध घेण्यासाठी एका खासगी डॉक्टरकडे जावे लागले, गावात शासनाकडून कोणतेही वैद्यकीय किट उपलब्ध झाले नाही. पण आम्ही आमच्या भावाला वाचवू शकलो नाही, असे अनिल यांच्या भावाने सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lucknow villages hit badly by corona second wave around 15 persons died in with covid like symptoms bakshi ka talab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app