शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

बलात्काराच्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्र 23 व्या स्थानी, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत दहावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:59 AM

गेल्या एक वर्षात देशात झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथा आहे. महिलांवरील अत्याचाराच्या एकूण प्रकरणातदेखील क्राईम रेटमध्ये राज्य १० व्या नंबरवर आहे.

अतुल कुलकर्णी - मुंबई : साकीनाक्यातील बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२० च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या क्राईम रेटमध्ये महाराष्ट्राचा २३ वा नंबर आहे. तर गेल्या एक वर्षात देशात झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथा आहे. महिलांवरील अत्याचाराच्या एकूण प्रकरणातदेखील क्राईम रेटमध्ये राज्य १० व्या नंबरवर आहे.एनसीआरबी ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. दरवर्षी त्यांच्यावतीने देशातील गुन्हेगारीची आकडेवारी प्रकाशित केली जाते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची सूचना केली होती, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरात महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांची जंत्री राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात दिली होती. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रात महिलांवरील गुन्हे कसे कमी होत चालले आहेत, याची आकडेवारी दिली आहे.गेल्या वर्षभरात देशात बलात्काराच्या जेवढ्या घटना झाल्या त्यात महाराष्ट्राचा चौथा नंबर आहे. सर्वाधिक घटना ५३१० बलात्कार राजस्थानमध्ये घडले आहेत. त्या खालोखाल उत्तरप्रदेश - २७६९, मध्यप्रदेश - २३३९, आणि महाराष्ट्र - २०६१ या राज्यांतील घटनांचा समावेश आहे. २०२० मध्ये २१९ बलात्कार करून खून केल्याच्या २१९ घटना देशात घडल्या. त्यातील २० घटना महाराष्ट्रातील आहेत. राज्यात २०१८ मध्ये २३ आणि २०१९ मध्ये १५ अशा घटना घडल्या होत्या. हुंडाबळीच्या घटनांचे गुन्हे नोंदवण्यामध्ये राज्याचा ९ वा क्रमांक आहे मात्र या गुन्ह्याच्या क्राईम रेटमध्ये राज्य देशात १८ व्या क्रमांकावर आहे.

अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात कमी होत आहे.२०१८       ३५,४९७२०१९       ३७,१४४२०२०       ३१,९५४

मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील गुजरात कनेक्शन- राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुजरातविषयीची आकडेवारी दिली होती. त्या पत्रात ठाकरे यांनी, ‘गुजरात पोलिसांच्या रिपोर्टनुसारच रोज १४ महिलांवर बलात्कार, यौन शोषणसारख्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. - गेल्या काही काळात अहमदाबादमधून २९०८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत गुजरातमधून १४ हजार २२९ महिला बेपत्ता झाल्या. - २०१५ सालापासून गुजरातमध्ये महिलांवरील निर्घृण अत्याचारांनी टोक गाठले आहे’, असा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी त्या पत्राची होळीदेखील केली होती.

बलात्काराचा क्राईम रेट राजस्थान     १३.९%  दिल्ली     १०.५%  हरयाणा     १०.०%  आसाम     ९.७%  मध्य प्रदेश     ३.५%  महाराष्ट्र     ३.५% 

अत्याचाराची प्रकरणे(महाराष्ट्राचा देशात १० वा नंबर)ओडिशा     ५५.८% आसाम     २७.२% तेलंगण     २६.३% राजस्थान     २२.७% महाराष्ट्र     १६.८%  

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिलाPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र