निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. पुण्याच्या राजगुरुनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली, ज्यात एक मनोरंजक प्रसंग घडला. अजित पवार यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख 'राज्याचे मुख्यमंत्री' असा केला. यामुळे सभेतील वातावरण अधिक रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी अजित पवारांनी मला 'उपमुख्यमंत्री म्हणा, मुख्यमंत्री नाही', अशी विनोदी प्रतिक्रिया दिली.
पुण्याच्या राजगुरुनगर येथे काल पार पडलेल्या सभेत अजित पवारांनी अनेक मुद्द्यावर भाषण केले. माणुसकी म्हणून जगताना जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा आणि हुतात्मा राजगुरू यांचे बलिदान कोणी विसरू शकत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांच्या कार्यशैलीवर टीका करणाऱ्या विरोधकांनाही लक्ष्य केले.
प्रशासन मला टरकून राहते, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजित म्हणाले...
अजित पवार पुढे म्हणाले की, "मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोकं माझ्यावर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले, हे दाखवून द्या. उलट प्रशासन मला टरकून राहते."
निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन...
प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी जनतेला निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "येत्या हिवाळी अधिवेशानात येथील जनतेचा प्रश्न मार्गी लावतो. आता आचारसंहिता असल्याने मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. त्यासाठी किती निधी लागेल? हे पाहतो. तुम्ही माझे ऐकले तर मी तुमचे ऐकेन. परत म्हणाल मी दम दिला."
Web Summary : During a rally, a worker called Ajit Pawar 'Chief Minister,' prompting a humorous response. Pawar addressed development, criticized opponents, and urged election support, promising to resolve public issues. He refuted corruption allegations.
Web Summary : एक रैली के दौरान, एक कार्यकर्ता ने अजित पवार को 'मुख्यमंत्री' कहा, जिससे हास्यपूर्ण प्रतिक्रिया हुई। पवार ने विकास पर बात की, विरोधियों की आलोचना की, चुनाव में समर्थन का आग्रह किया और सार्वजनिक मुद्दों को हल करने का वादा किया। उन्होंने भ्रष्टाचार के आरोपों का खंडन किया।