Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 18:42 IST2018-10-23T18:42:38+5:302018-10-23T18:42:52+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 ऑक्टोबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर
जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप
पंकजा'ताई'विरोधातही उमेदवार देणार उद्धव'दादू'; बीडमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार
दुष्काळी कामांना सुरुवात होईल तेव्हाच आभार; तोपर्यंत ‘आभार सदृष्य धन्यवाद’
गरीबांना घरं देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
उदयनराजे, शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल; 'जमावबंदी'चा भंग करून आले होते आमनेसामने
मराठवाड्यात येणार ९ टीएमसी पाणी; गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश
नरभक्षक वाघिणीचे भविष्य वन विभागाच्या हातात
केंद्र सरकारकडून ‘एलआयसी’च्या निधीचा दुरुपयोग; यशवंत सिन्हा
'तो' तब्बल ३० वर्षांनंतर झोपला अन् आईने पेढेच वाटले!