Maharashtra News LIVE: "अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर वाईट पद्धतीने काढून टाकले"; रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवला

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 21:40 IST2026-02-03T09:49:31+5:302026-02-03T21:40:58+5:30

Today's India Maharashtra Breaking News in Marathi LIVE : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून वेगवेगळे अंदाज, तर्कवितर्क, शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वेगवेगळे ...

Maharashtra Marathi News Live Updates: 3 February 2026 Us tariff on india Narendra Modi Donald Trump NCP merger Devendra Fadnavis, Rahul Gandhi in Lok sabha, Ajit Pawar, Sunetra pawar | Maharashtra News LIVE: "अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर वाईट पद्धतीने काढून टाकले"; रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवला

Maharashtra News LIVE: "अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर वाईट पद्धतीने काढून टाकले"; रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवला

Today's India Maharashtra Breaking News in Marathi LIVE : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून वेगवेगळे अंदाज, तर्कवितर्क, शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वेगवेगळे नेते वेगवेगळे दावे करत असल्याने या विषयाबाबतचा संभ्रम वाढतच चालला आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि भाजपा नेतृत्वाकडून काय सांगितलं जातं, याबद्दल उत्सुकता आहे. त्याचवेळी भारतासाठी एक आनंदाची बातमी अमेरिकेतून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कपातीची घोषणा केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावरून काल लोकसभेत गदारोळ झाला होता. आता आज त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे LIVE UPDATES...

LIVE

Get Latest Updates

03 Feb, 26 : 07:51 PM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठा अपघात, बोगद्याजवळ गॅस टँकर पलटला

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. आडोशी बोगद्याजवळ एक गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकरमधून गॅस लिक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे तातडीने मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक थांबवण्यात आली.

03 Feb, 26 : 07:35 PM

अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर नगरपालिकेने काढले, रोहित पवार चिडले

कर्जत शहरात अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढून टाकण्यात आले. त्याचा व्हिडीओ पोस्ट करत आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. याची चौकशी करून सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

03 Feb, 26 : 07:31 PM

अजित पवारांच्या अस्थींचे मुंबईतील समुद्रात विसर्जन

अजित पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी मुंबईतील समुद्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांनी अस्थींचे पूजन केले आणि त्या समुद्रात विसर्जित केल्या.

ठाण्यातही अजित पवार यांच्या अस्थींचे पूजन करून विसर्जन करण्यात आले. यावेळी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

03 Feb, 26 : 06:34 PM

अजित पवारांच्या नेत्यांनाही विमान अपघाताबद्दल शंका - अनिल देशमुख

"अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल फक्त आम्हालाच नाही, तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, आमदारांनाही शंका आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. 

"केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर मला कधी विमानतळावर भेटले, तर तुम्ही छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नका, असे मी त्यांना सांगणार आहे", असे आश्चर्यजनक विधान अनिल देशमुख यांनी केले.

03 Feb, 26 : 06:20 PM

"आपण महाराष्ट्राला सावरण्यासाठी...", सुनेत्रा पवारांना सुनील तटकरेंनी दिल्या शुभेच्छा

अजित पवार यांच्या निधनामुळे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त झाले. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. 

या नव्या जबाबदारीसाठी सुनील तटकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. "आपण आज पुणे व बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत आहात. आभाळाएवढे दुःख बाजूला सारून आपण महाराष्ट्राला सावरण्यासाठी जे धैर्य दाखवत आहात, ते शब्दांच्या पलीकडले आहे", असे तटकरे म्हणाले.

03 Feb, 26 : 05:36 PM

नरवणे, एपस्टिन प्रकरणात मोदी इतके का घाबरले आहेत? - राहुल गांधी

विरोधी पक्षनेत्याला लोकसभेमध्ये बोलू दिले जात नाही असा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 

"इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर प्रश्नावर लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नाहीये. जनरल नरवणे यांचे विधान आणि एपस्टिन प्रकरणावरून मोदीजी इतके का घाबरले आहेत?", असा सवाल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींनी केला. 

03 Feb, 26 : 05:21 PM

कपिल देव यांचा पाकिस्तान क्रिकेटला मोठा इशारा

आगामी टी२० विश्वचषक २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "पाकिस्तानचा हा निर्णय भारतापेक्षा पाकिस्तानच्या स्वतःच्या क्रिकेट भविष्यासाठी अधिक घातक ठरेल. हा केवळ राजकारणाचा किंवा प्रतिमेचा प्रश्न नाही, तर थेट तरुण क्रिकेटपटूंच्या करिअरचा प्रश्न आहे. जर हा निर्णय खेळाडूंनी घेतला असेल, तर त्यांनी समोर येऊन तसे सांगावे. पण जर बोर्ड सांगत असेल की तुम्ही खेळू नका, तर यामुळे तुमच्या देशाची प्रतिष्ठा खालावते." (वाचा संपूर्ण बातमी)

03 Feb, 26 : 04:18 PM

AIMIM महापौरपदाच्या शर्यतीत...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौरपदासाठी AIMIM आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता. पक्षाचे ३३ नगरसेवक विजयी. बहुमताच्या आकड्यापासून बरेच दूर. मात्र, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा, काही तडजोड करण्याचाही विचार करू; खासदार इम्तियाज जलील यांचं सूतोवाच

03 Feb, 26 : 03:24 PM

लोकसभेत सभापतींच्या आसनाच्या दिशेने कागदाचे तुकडे उडवणाऱ्या सहा काँग्रेस खासदारांवर निलंबनाची कारवाई

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजही डोकलाम मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अप्रकाशित पुस्तकातील दाखले देणं नियमबाह्य असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यावरून बरीच शाब्दिक चकमक झाली. त्याचवेळी, काही विरोधी खासदारांनी सभापतींच्या आसनाच्या दिशेने कागदाचे तुकडे भिरकावले. 

03 Feb, 26 : 02:52 PM

सुनेत्रा पवार दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. राज्य सरकारने याबाबत आज पत्रक काढलं. अजित पवारांकडे या दोन जिल्ह्यांची जबाबदारी होती, ती आता सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. 

03 Feb, 26 : 02:21 PM

नाशिकच्या महापौैरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांचे नावे जाहीर

नाशिक- महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांच्या उमेदवारीची घोषणा भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. आज सकाळी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. 

03 Feb, 26 : 02:18 PM

सुनेत्रा पवार यांच्याकडे आपले नेतृत्व सोपवायचे : पटेल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच आपल्या पक्षाचे नेतृत्व सोपवायचे आहे, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

03 Feb, 26 : 02:10 PM

आमच्यापुढे विलिनीकरणाचा विषय नाही : प्रफुल्ल पटेल

आमच्यापुढे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय नाही,  सर्वात आधी आम्हाला आमच्या पक्षातील मुद्दे सुरळीत करु द्या, इतर कोणत्याही विषयावर बोलणे आता योग्य नाही, असेही पटेल म्हणाले.

03 Feb, 26 : 02:03 PM

ज्यांचा आमच्या पक्षाशी संबंध नाही, ते आमच्या पक्षासंदर्भात बोलतात : प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल, मी त्या शर्यतीत नाही, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून अध्यक्षपदाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी हे विधान केले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं काहींच्या पोटात दुखतंय. मात्र, विधिमंडळ पक्षनेता कोणाला करायचे हा प्रश्न आमच्या पक्षाचा आहे, असंही पटेल म्हणाले.

03 Feb, 26 : 01:17 PM

अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही; भाऊ श्रीनिवास पवार यांची माहिती, कारण सांगितलं

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही, अशी माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली . तिसऱ्या दिवशीच सर्व विधी पूर्ण केले असल्यामुळे आता दशक्रिया विधी होणार नसल्याची त्यांनी सांगितले.

03 Feb, 26 : 01:01 PM

विमान अपघातावर संशय येणं साहजिक; चौकशी अहवाल येईल – चंद्रकांत पाटील

'जेव्हा जेव्हा राजकीय व्यक्तीचा अपघात होतो आणि त्यामध्ये व्यक्ती दगावते, तेव्हा प्रत्येक वेळी साहजिकच त्यांचे नातेवाईक आणि विरोधकांना संशय येतो. त्या संदर्भातील चर्चा होणे चुकीचे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचा अहवाल लवकरच समोर येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

03 Feb, 26 : 01:01 PM

कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदाची निवड बिनविरोध

कल्याण डोंबिवलीची महापौरपदाची निवड बिनविरोध करण्यात आली. महापौरपदी हर्षाली थविल यांची निवड करण्यात आली आहे.

03 Feb, 26 : 12:31 PM

पुण्याचे महापौर, उपमहापौर ठरले; भाजपकडून घोषणा

पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ठरले असून भाजपाने नावांची घोषणा केली. महापौरपदी मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

03 Feb, 26 : 12:06 PM

आम्हाला पाठिंबा दिला असता तर आंदोलनाची वेळ आली नसती : सरनाईक

मराठी एकीकरण समितीने आज मीरा- भाईंदर मध्ये मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी आंदोलन केले आहे.  यावरुन सरनाईक यांनी टाकी केली. "मराठी एकीकरण समिती कुठून आली, नरेंद्र मेहता आमदार झाले तेव्हा आंदोलन का केले नाही? आम्हाला पाठिंबा दिला असता तर आंदोलनाची वेळ आली नसती, अशी टीका मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर केली.

03 Feb, 26 : 11:36 AM

शरद पवारांनी अचानक दिल्ली दौरा केला रद्द; बारामतीसाठी रवाना

खासदार शरद पवार यांनी आज अचानक दिल्ली दौरा रद्द केला असून आता बारामतीसाठी रवाना झाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून  दोन्ही राष्ट्रवादी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता पवार यांनी अचानक दिल्ली दौरा रद्द करुन बारामतीसाठी रवाना झाले आहेत.

03 Feb, 26 : 11:21 AM

मिरा- भाईंदरमध्ये मराठी व्यक्ती 'महापौर' झाला पाहिजे यासाठी आंदोलन

मिरा -भाईंदरमध्ये भाजपाने डिंपल मेहता यांचे नाव महापौर पदासाठी जाहीर केले. दरम्यान, आता मेहता यांना विरोध सुरू झाला आहे. मिरा -भाईंदरमध्ये मराठी व्यक्तीच महापौर व्हावा अशी मागणी मराठी एकिकरण समितीने केली आहे. याबाबत आज समिती आंदोलन करणार आहे.

03 Feb, 26 : 11:14 AM

मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड; सभांच्या वेळा बदलल्या

मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे, यामुळे त्यांच्या आजच्या सभांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरहून हे हेलिकॉप्टर निघणार होते पण तांत्रिक बिघाड झाल्यमुळे रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली.

03 Feb, 26 : 11:12 AM

मुंबईच्या महापौर निवडीबाबत हालचाली...

मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या गटनोंदणीनंतर महापौरपदाच्या निवडीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यात भाजपकडून रितू तावडे, राजश्री शिरवाडकर, शितल गंभीर यांची नावं आघाडीवर आहेत. येत्या ४८ तासांत भाजपकडून मुंबईच्या महापौर कोण होईल याचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं.

03 Feb, 26 : 11:11 AM

जय पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट; तो फोटो केला शेअर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन होऊन पाच दिवस उलटले. या दु:खातून सावरत असतानाच आता अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जय पवार  वडिलांसोबतचा एक फोटो ठेवला आहे. या फोटोला त्यांनी बाबा, 'तुमची खूप आठवण येते', ही कॅप्शन दिली आहे.  

 

 

03 Feb, 26 : 10:59 AM

भारत-अमेरिका व्यापार कराराकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहतो : खासदार सस्मित पात्रा

दिल्ली: भारत-अमेरिका व्यापार करारावर खासदार सस्मित पात्रा म्हणाले, "हे एक अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. हा करार युरोपियन युनियन-भारत मुक्त व्यापार करारानंतर आणि त्यापूर्वी झालेल्या यूके कराराच्या पार्श्वभूमीवर होत आहे, आणि आपण सध्या ज्या जागतिक आव्हानांना सामोरे जात आहोत, ते पाहता, हा व्यापार करार ती आव्हाने कमी करण्यास मदत करेल. यामुळे सहकार्याची नवीन क्षेत्रे खुली होतील. कमी झालेल्या शुल्कांमुळे देशाला आणि त्याच्या निर्यातीला अमेरिकेत बाजारपेठा शोधण्यासही मदत होईल. केवळ व्यापार आणि वाणिज्यच नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातही संयुक्त सहकार्याची संधी मिळेल. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 'एआय ग्लोबल इम्पॅक्ट समिट'च्या अगदी आधी हा करार होत असल्याने, ही एक अशी संधी आहे जिथे अमेरिकन तंत्रज्ञान आणि भारतीय उत्पादने एकत्र काम करू शकतात. मी याकडे एक अत्यंत सकारात्मक पाऊल म्हणून पाहतो."

03 Feb, 26 : 10:38 AM

पश्चिम बंगालमध्ये कोळसा खाणकाम आणि वाहतूक प्रकरणाशी संबंधित ईडीची छापेमारी. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये कोळशाच्या कथित अवैध खाणकाम आणि वाहतुकीच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली.

03 Feb, 26 : 10:34 AM

"चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने जबाबदारी झटकली : संजय राऊत

"चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने आपली जबाबदारी झटकली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्द्यारुन त्यांनी हा आरोप केला.

 

03 Feb, 26 : 10:30 AM

"चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने जबाबदारी झटकली : संजय राऊत

"चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने आपली जबाबदारी झटकली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या मुद्द्यारुन त्यांनी हा आरोप केला.

 

03 Feb, 26 : 10:25 AM

११ फेब्रुवारीला मुंबईला नवा महापौर मिळणार

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईला नवा महापौर मिळणार आङे. मुंबईचा महापौर भाजपचाच असेल हे आता स्पष्ट झाले असून १८ फेब्रुवारीला महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. त्यानंतर २६ किंवा २६ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

03 Feb, 26 : 10:15 AM

भारत-अमेरिका व्यापार करारावर शिक्कामोर्तब झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एनडीएतर्फे सत्कार

03 Feb, 26 : 10:13 AM

काँग्रेसनं दिला स्थगन प्रस्ताव, इतर सर्व कामकाज बाजूला ठेवून लोकसभेत भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा करण्याची मागणी

03 Feb, 26 : 10:09 AM

सीआयडी शोधणार अजितदादांच्या अपघाती मृत्यूचं कारण

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडे वर्ग, अधिकारी बारामतीत जाऊन चौकशी करणार; सर्व अँगल पडताळून पाहणार

03 Feb, 26 : 10:03 AM

मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय, नवा अध्यक्ष सुरू; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

03 Feb, 26 : 09:58 AM

भारतासाठी अमेरिकेतून खुशखबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रॅम्प यांनी टॅरिफ कपातीची घोषणा केली आहे. भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तसंच या निर्णानंतर, अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. 

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates: 3 February 2026 Us tariff on india Narendra Modi Donald Trump NCP merger Devendra Fadnavis, Rahul Gandhi in Lok sabha, Ajit Pawar, Sunetra pawar