26 Feb, 26 07:53 PM
"आपण आठवीच्या मुलांना काय शिकवत आहात?"; NCERT वादावर पंतप्रधान मोदीही संतापले!
एनसीईआरटीच्या (NCERT) पाठ्यपुस्तकातील वादग्रस्त मजकुरावरून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, माध्यमिक शाळेसाठी तयार करण्यात आलेल्या एका पुस्तकात न्यायपालिकेशी संबंधित भ्रष्टाचार अशा आशयाच्या प्रकरणावरून पंतप्रधानांनी संताप व्यक्त केला. या विषयाची शैक्षणिक उपयुक्तता आणि त्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया या दोन्हींवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "इयत्ता ८ वीच्या मुलांना आपण न्यायालयीन भ्रष्टाचाराबद्दल नेमके काय शिकवत आहोत?" असा परखड सवालही पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केला.
26 Feb, 26 07:09 PM
पार्थ पवार राज्यसभेवर जाणार; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवशेनात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची घोषणा केली. पार्थ पवार यांना निवडून देण्यासाठी हवी असलेली मते आपल्याकडे असल्याचेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
26 Feb, 26 06:43 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर दादांनी महाराष्ट्र पिंजून काढला - सुनेत्रा पवार
26 Feb, 26 06:40 PM
महाराष्ट्राच्या विकासासाठी दादा आयुष्यभर झटले. दादांची स्वप्न अपूर्ण राहणार नाहीत - सुनेत्रा पवार
26 Feb, 26 06:28 PM
द. आफ्रिकेची तुफानी फलंदाजी, विंडिजचा मोठा पराभव, भारताला दिलासा
दक्षिण आफ्रिकेने सुपर-८च्या दुसऱ्या सामन्यात विंडिजचा दारूण पराभव केला. १७७ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने अवघ्या १६.१ षटकांत गाठले. त्यामुळे विंडिजचा नेट रनरेट कमी झाला, तर भारताच्या सेमीफायनलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
26 Feb, 26 06:21 PM
समाजकार्य महाविद्यालयांतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी- मंत्री चंद्रकांत पाटील
राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली. वाचा संपूर्ण बातमी
26 Feb, 26 06:02 PM
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निव़़ड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.
26 Feb, 26 05:16 PM
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत वाढ; अल्पवयीन 'बटुकां'च्या वैद्यकीय अहवालात लैंगिक शोषणाची पुष्टी
अल्पवयीन बटुकांच्या कथित लैंगिक शोषणासंदर्भातील आरोपात अडकलेल्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलिसांकडून करण्यात आलेल्या वैद्यकीय तपास अहवालात दोन्ही पीडित अल्पवयीन मुलांसोबत अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी संबंधित दोन्ही मुलांची बुधवारी वैद्यकीय तपासणी केली. एवढेच नाही तर, तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनीही, अहवालात लैंगिक अत्याचाराचे संकेत स्पष्टपणे नोंदवण्यात आले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात काही बड्या राजकीय नेत्यांचा आणि वीआईपींचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
26 Feb, 26 05:03 PM
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैैठकीला सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. तर पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता.
26 Feb, 26 04:54 PM
धुळ्यात बुलेटधारकांवर धडक कारवाई; १८ सायलेन्सर जप्त
धुळे शहरातील विविध भागांत शहर वाहतूक शाखेच्या वतीने बुलेटधारकांवर विशेष कारवाई करण्यात आली. कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करत वाहतूक नियमांचे पालन करण्याचा कडक संदेश देण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये व क्लासेसच्या परिसरात मोठा आवाज करणाऱ्या बुलेट वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या कारवाईत १८ बुलेटधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सायलेन्सर जप्त करण्यात आले.
26 Feb, 26 04:53 PM
जन्म प्रमाणपत्र घोटाळा: 1016 जणांवर कारवाई
अमरावती जन्म प्रमाणपत्र घोटाळा ,1016 जणांवर कारवाई, अमरावतीच्या तहसीलदारांच्या "आदेशानुसार" 2896 बांगलादेशी/अपात्र व्यक्तींना जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली. यापैकी, 1016 अर्जदार/लाभार्थ्यांनी बनावटी, खोटी कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या 1016 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा/FIR दाखल करण्यात आला आहे.
26 Feb, 26 04:53 PM
महानगरपालिकेच्या उद्यानात चार दिवसीय गुलाब उत्सव
अमरावती महानगरपालिकेच्या उद्यानात चार दिवसीय गुलाब उत्सवाचे आयोजन.
अमरावतीकरांना गुलाबाच्या वेगवेगळ्या प्रजातीची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने गुलाब उत्सवाचे आयोजन.
गार्डन मध्ये ठेवण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या प्रजातीचे शेकडो गुलाबांचे झाडे.
गुलाब उत्सव संपल्यानंतर या झाडांचे याच ठिकाणी प्रत्यारोपण केले जाणार.
महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त सोम्या शर्मा यांच्या हस्ते गुलाब प्रदर्शनाचे उदघाटन.
26 Feb, 26 04:52 PM
बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी बेकायदेशीर IVF व सोनोग्राफी सेंटरवर कारवाई
बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात सहभागी असलेल्या बेकायदेशीर IVF सेंटर तसेच सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली. त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या अध्यक्षा आहेत. या प्रकरणात नाशिक येथील मालती IVF सेंटर हे ठाणे येथे चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. संबंधित सेंटरच्या माध्यमातून स्त्रीबीज तस्करीचे कृत्य सुरू असल्याची माहितीही समोर आली असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
26 Feb, 26 04:52 PM
रब्बी हंगामात धान रोवणीला वेग
गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. खरीपसोबतच रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणात धान लागवड केली जाते. यंदा रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे 6 हजार 200 हेक्टरवर धानाची नर्सरी तयार करण्यात आली असून, एकूण 65 हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.सध्या 23 हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी दिली. दरम्यान, शेतकरी मका व भाजीपाला यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळत असल्याने यंदा धान लागवडीच्या क्षेत्रात काहीशी घट होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
26 Feb, 26 04:51 PM
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अखेर मागे
-चार दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अखेर सुटले.
-शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव यांच्या शिष्टाईला यश.
-कांदा आणि मका या पिकांना कमी दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला.
उपोषणकर्त्यांच्या भावनांशी शासनही सहमत.
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार माजी आमदार पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची स्थापना.
येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळाच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणली जाणार; त्यातून शेतकऱ्यांचे समाधान होईल, अशी माहिती.
26 Feb, 26 04:50 PM
हिंदूंच्या सणासाठी मुस्लिम कारागिरांकडून हार-कंगन; चाळीस वर्षांची परंपरा कायम
हिंदूंच्या सणासाठी गेल्या 40 वर्षांपासून धुळ्यातील मुस्लिम समाज हार-कंगन तयार करून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत आहे. त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रमजानचे रोजे ठेवूनही मुस्लिम बांधव हार-कंगन बनवण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. होळी आणि गुढीपाडवा हे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या सणांसाठी हार-कंगन हा पदार्थ महत्त्वाचा मानला जातो. हा पदार्थ तयार करण्याची चाळीस वर्षांची परंपरा धुळ्यातील हलवाई परिवाराने जपली आहे. त्यांच्याकडूनच हार-कंगनाची खरेदी केली जाते.
26 Feb, 26 04:50 PM
उन्हाळ्याची चाहूल; जंगलातील पाण्याचे स्रोत आटले, कृत्रिम पाणवटे नसल्याने वन्यप्राणी गावाकडे
उन्हाळ्याची चाहूल लागू लागली असून सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. चोपडा तालुक्याला सातपुडा पर्वतरांग यांचे नैसर्गिक वरदान लाभले आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये विविध वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होते. मात्र उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे येताना दिसत आहेत.
26 Feb, 26 04:49 PM
धुळ्यातील शिरपूर येथील वैध मापन कार्यालय ‘रामभरोसे’; कार्यालयाला चक्क कुलूप!
शिरपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून वजनकाट्यांबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढत असून, तक्रार करायची तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरातील वैध मापन कार्यालय अक्षरशः ‘रामभरोसे’ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नियमितपणे उपस्थित नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाऱ्यावर सोडल्या जात असल्याचे चित्र आहे.
26 Feb, 26 04:49 PM
हल्लेखोर तुषार दामगुडे याच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी
भाजपशी संबंधित मोकाट हल्लेखोर तुषार दामगुडे याच्यावर तात्काळ दखलपात्र कलमांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच त्याचा शस्त्र परवाना त्वरित रद्द करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन भाकपचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना सादर केले.
26 Feb, 26 04:47 PM
समाज कार्य महाविद्यालयांतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी
राज्यातील सर्व समाज कार्य महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
26 Feb, 26 04:46 PM
तथाकथित ‘इपस्टीन फाईल्स’ प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची टीका
तथाकथित ‘इपस्टीन फाईल्स’ प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधानांवर टीका केली. या प्रकरणात पंतप्रधानांचे नाव चर्चेत येत असल्याचा दावा करत, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शांत का आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्वतःला देशभक्त संघटना म्हणवत असेल, तर त्यांनी या संदर्भात नरेंद्र मोदींना जाब का विचारू नये, असा थेट प्रश्नही त्यांनी केला.
26 Feb, 26 04:44 PM
२ मार्चला वंचित बहुजन आघाडी चे मुंबईत धरणे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २ मार्च रोजी मुंबई येथे भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई कमिटीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांनी सहभागी होऊन समर्थन द्यावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
26 Feb, 26 04:44 PM
'द केरळ स्टोरी २': रिलीजच्या एक दिवस आधीच कोर्टाची स्थगिती
दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांचा 'द केरळ स्टोरी २' हा चित्रपट सध्या देशभरात चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता रिलीजच्या एक दिवस आधीच चित्रपट मोठ्या वादात सापडला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही प्रेक्षकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी अनेकांनी हा चित्रपट समाजात द्वेष पसरवणारा असल्याचा आरोप केला आहे. सिनेमाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केरळ उच्च न्यायालयाने आज गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
26 Feb, 26 04:21 PM
रायगड; महाडच्या एमआयडीसीमधील एम्बॉयो कंपनीला भीषण आग
रायगड जिल्ह्यातील महाडमधील एमआयडीसीतल एम्बॉयो कंपनीला भीषण आग लागली आहे. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंंब घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
26 Feb, 26 03:41 PM
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही
राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपलांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे प्रमुख ध्येय आहे. विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
26 Feb, 26 03:39 PM
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आणे येथे पिकअप व बोलोरो या दोन वाहनांच्या भीषण अपघातात एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप (एमएच १६ डीपी ०१०३) अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठार या ठिकाणाहून कलिंगड भरून मुंबईला जात होता.
26 Feb, 26 03:33 PM
स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावे- प्रसाद लाड
विधान परिषदेत भाजप नेते प्रसाद यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
26 Feb, 26 02:27 PM
'जम्मू-काश्मीरचे बजेट पाकिस्तानला IMF कडून मिळणाऱ्या मदतीपेक्षा जास्त', UN मध्ये भारताने PAK ची हवा काढली
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मानवाधिकार परिषदेच्या 55व्या अधिवेशनात भारताने पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) यांच्याकडून जम्मू-काश्मीरविषयी मांडल्या जाणाऱ्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी अनुपमा सिंह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाकिस्तानकडून करण्यात येणारे आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे असून, OIC ही पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणारी संघटना बनली आहे.
अनुपमा सिंग यांनी जम्मू-काश्मीरमधील अलीकडील निवडणुकांचा उल्लेख करत सांगितले की, तिथे विक्रमी मतदान झाले असून, यावरून स्पष्ट होते की, स्थानिक नागरिकांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि हिंसेच्या विचारसरणीला नकार दिला आहे. जनता आता विकास आणि लोकशाहीच्या मार्गावर विश्वास ठेवत आहे. पाकिस्तानवर टोला लगावत त्यांनी चिनाब रेल्वे पुलाचे उदाहरण दिले. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असून गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सुरू करण्यात आला. किंवा कदाचित जम्मू-काश्मीर राज्याचे बजेट पाकिस्तानला मिळालेल्या अलीकडील IMF बेलआउट पॅकेजपेक्षा दुप्पट असल्याची वस्तुस्थिती त्यांना स्वीकारता येत नसेल.
26 Feb, 26 02:27 PM
दावोसमध्येच करार का करता? विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे चोख उत्तर
दावोस येथे महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या सामंजस्य करारांवर (MOU) विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत सविस्तर आणि ठाम भूमिका मांडली. 'दावोस छोटे गाव असले, तरी जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्था, आघाडीचे उद्योगपती आणि गुंतवणूकदार तिथे एकत्र येतात. अर्थव्यवस्थेत पुढे जायचे असेल, तर दावोससारख्या व्यासपीठावर जाणे अपरिहार्य आहे', असे मुख्यमंत्री म्हणाले.
26 Feb, 26 02:11 PM
'सहारा इंडिया'तील गुंतवणूकदारांसाठी संधी; १० लाखांपर्यंतचे क्लेम पुन्हा करता येणार
जर तुम्ही सहारा इंडियामध्ये पैसे गुंतवले असतील आणि क्लेम करूनही तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सहारा इंडिया रिफंड पोर्टलवर पुन्हा एकदा 'रिसबमिशन'चा पर्याय उपलब्ध झाला आहे.
26 Feb, 26 02:11 PM
ती आकडेवारी कपोलकल्पित, मराठी शाळा बंद पडल्या नाहीत - मुख्यमंत्री
मराठी शाळा बंद पडल्या पाहिजेत हा प्रश्न माझ्यासह सगळ्यांना पडला आहे. मराठी शाळेबाबत केवळ भावना असून उपयोग नाही तर कृती हवी. पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी इंजिनिअरिंग शिक्षणापासून सर्व शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली. आजही ८४ टक्के शाळा मराठी माध्यमांच्या आहेत. मराठी शाळांसोबत इंग्रजीही शिकली पाहिजे, मराठी शाळा बंद पडण्याची जी आकडेवारी आली आहे ते कपोलकल्पित आहे - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
26 Feb, 26 01:59 PM
विमानतळावरच प्रवाशांचा हायव्होल्टेज राडा; इंडिगो फ्लाइट ६ई१०२५ मध्ये नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून विमानसेवेसंदर्भात सातत्याने तक्रारी येत आहेत. आता इंडिगो एअरलाईन्स पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिगोच्या विमान ६ई१०२५ मधील जवळपास २०० प्रवाशांनी विमानातच हाय होल्टेज राडा केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यामध्ये संतप्त प्रवासी विमानाच्या एक्झिट गेटजवळ आरडाओरड करताना दिसत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, चेन्नईहून सिंगापूरसाठी जाणाऱ्या विमानात हा संपूर्ण राडा झाला.
सविस्तर वाचा - विमानतळावरच प्रवाशांचा हायव्होल्टेज राडा; इंडिगो फ्लाइट ६ई१०२५ मध्ये नेमकं काय घडलं? बघा VIDEO
26 Feb, 26 01:56 PM
पंतप्रधान मोदींनी वाहिली नरसंहारातील मृतांना श्रद्धांजली; इस्रायलमधील यॅड वाशम स्मारकाला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इस्रायल दौऱ्यादरम्यान जेरुसलेममधील यॅड वाशम या जागतिक होलोकॉस्ट स्मृती स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे देखील उपस्थित होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या भीषण नरसंहारात मृत्यूमुखी पडलेल्या लाखो ज्यू बांधवांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली.
26 Feb, 26 01:54 PM
रेल्वे मार्गासाठी संपादित जमिनींना राष्ट्रीय महामार्गाचा दर लागू करा; अनिल गोटे यांची मागणी
मनमाड–इंदोर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, पुरेसा मोबदला मिळत नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला आहे. मनमाड–इंदोर रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींना राष्ट्रीय महामार्गाला देण्यात आलेल्या जमिनीप्रमाणेच दर लागू करावा, तसेच भूसंपादित शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला केंद्र सरकारच्या रेल्वे सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
26 Feb, 26 01:51 PM
तब्बल २४ वर्षानंतर झिम्बाब्वे टीम इंडियाविरुद्ध भारतात खेळणार!
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल २४ वर्षानंतर झिम्बाब्वे टीम इंडियाविरुद्ध भारतात खेळणार आहे.
26 Feb, 26 01:50 PM
खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा, मेघा सोमय्या मानहानीप्रकरणी निर्दोष सुटका
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मेघा सोमय्या मानहानीप्रकरणी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे.
26 Feb, 26 01:50 PM
तब्बल २४ वर्षानंतर झिम्बाब्वे टीम इंडियाविरुद्ध भारतात खेळणार!
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल २४ वर्षानंतर झिम्बाब्वे टीम इंडियाविरुद्ध भारतात खेळणार आहे.
26 Feb, 26 01:48 PM
जगाने वाळीत टाकलेल्या व्यक्तीला पंतप्रधान का भेटले? मेहबूबा मुफ्तींचा PM मोदींना थेट सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यावरून पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. "पंतप्रधानांनी एका गुन्हेगाराची गळाभेट घेतली आहे," असे वक्तव्य मुफ्ती यांनी केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, नेतन्याहू यांना आज संपूर्ण जगाने वाळीत टाकले आहे आणि अनेक देशांनी त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अशावेळी पंतप्रधानांनी त्यांची भेट घेणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
26 Feb, 26 01:27 PM
दरवर्षी १० लाख रोजगार निर्मितीचं उद्दीष्ट - देवेंद्र फडणवीस
26 Feb, 26 01:26 PM
विरोधकांनी आतातरी अभ्यास करून मुद्दे मांडावेत - देवेंद्र फडणवीस
26 Feb, 26 01:25 PM
महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, महाराष्ट्राला आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय - देवेंद्र फडणवीस
26 Feb, 26 01:14 PM
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित, मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची टीका
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित आहे, ते ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीबाबत संभ्रम पसरवत आहेत. असा टोला राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी लगावला.
26 Feb, 26 01:10 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, आता सुप्रीम कोर्टानेही त्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर आज या अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणात वाल्मिक कराडने यापूर्वी बीड जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन तसेच दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता, दोन्ही न्यायालयांनी त्याचे अर्ज फेटाळले होते. त्यानंतर वाल्मिक कराडने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती, पण येथेही त्याला दिलासा मिळालेला नाही.
26 Feb, 26 01:06 PM
बोरिवलीत Apple स्टोअरचं ओपनिंग...
मुंबईत बीकेसीनंतर आता बोरिवलीच्या स्काय मॉलमध्ये Apple स्टोअर सुरु, उदघाटनाला प्रचंड गर्दी पाहा LIVE
26 Feb, 26 12:58 PM
दादांच्या विमान अपघाताचा तांत्रिक तपास व्हावा - रोहित पवार
अजित पवारांच्या विमान अपघाताचा आमच्या पातळीवर तपास सुरू आहे. DGCA कडून काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. VSR कंपनीचे विमान खराब होते मग ते दादांना का दिले? आम्हाला राजकारण करायचे नाही तर अपघाताचा तांत्रिक तपास व्हावा. हवाई वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे असं रोहित पवारांनी सांगितले.
26 Feb, 26 12:46 PM
खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा, मेघा सोमय्या मानहानीप्रकरणी निर्दोष सुटका
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मेघा सोमय्या मानहानीप्रकरणी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे.
26 Feb, 26 12:42 PM
पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात इराणची एन्ट्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण अधिकृत दौऱ्यावर आहेत. या ऐतिहासिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचा कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या इराणने भारताकडे एक मोठे आवाहन केले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आशा व्यक्त केली आहे की, पंतप्रधान मोदी या दौऱ्यात पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित करतील आणि तेथील लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवतील.
26 Feb, 26 12:37 PM
'जम्मू-काश्मीरचे बजेट पाकिस्तानला IMF कडून मिळणाऱ्या मदतीपेक्षा जास्त', UN मध्ये भारताने PAK ची हवा काढली
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मानवाधिकार परिषदेच्या 55व्या अधिवेशनात भारताने पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) यांच्याकडून जम्मू-काश्मीरविषयी मांडल्या जाणाऱ्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी अनुपमा सिंह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाकिस्तानकडून करण्यात येणारे आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे असून, OIC ही पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणारी संघटना बनली आहे.
अनुपमा सिंग यांनी जम्मू-काश्मीरमधील अलीकडील निवडणुकांचा उल्लेख करत सांगितले की, तिथे विक्रमी मतदान झाले असून, यावरून स्पष्ट होते की, स्थानिक नागरिकांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि हिंसेच्या विचारसरणीला नकार दिला आहे. जनता आता विकास आणि लोकशाहीच्या मार्गावर विश्वास ठेवत आहे. पाकिस्तानवर टोला लगावत त्यांनी चिनाब रेल्वे पुलाचे उदाहरण दिले. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असून गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सुरू करण्यात आला. किंवा कदाचित जम्मू-काश्मीर राज्याचे बजेट पाकिस्तानला मिळालेल्या अलीकडील IMF बेलआउट पॅकेजपेक्षा दुप्पट असल्याची वस्तुस्थिती त्यांना स्वीकारता येत नसेल.
26 Feb, 26 12:35 PM
वडिलांचे तुकडे केल्यावर मित्राला फोन करुन मागितली मदत
लखनौच्या आशियाना परिसरात झालेल्या मानवेंद्र सिंह यांच्या हत्येचा तपास आता केवळ गुन्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. घटनेनंतर आरोपी मुलगा अक्षत आणि मुलगी कृती यांच्या हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. विशेषतः दोघांचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक 'प्रायव्हेट' होणं आणि हत्येनंतर लगेचच अक्षतने आपल्या एका मित्राशी संपर्क साधणं या गोष्टी तपासात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. (अधिक वाचा)
26 Feb, 26 12:27 PM
अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा: सुनेत्रा पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित असल्याचा तांत्रिक अहवाल समोर आला असून, यामुळे अपघाताच्या वेळी नेमके काय घडले, याचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली असल्याचे समोर येत आहे. (आणखी वाचा)
26 Feb, 26 11:56 AM
दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री भूकंपाचा धक्का
गडचिरोली : अहेरी तालुक्यासह नागेपल्ली, आलापल्ली आणि जिमलगट्टा परिसरातील काही भागाला २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ११:५० च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शांत निद्रेत असलेल्या नागरिकांना अचानक जमीन हादरल्याचा भास झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नजीकच्या तेलंगणा राज्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
26 Feb, 26 11:51 AM
कांदा-मक्याला हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा आमरण उपोषण सुरू
चांदवडला कांदा आणि मका या पिकाला हमीभाव मिळत नसल्यामुळे, गेल्या चार दिवसांपासून चांदवड येथे आमरण उपोषण सुरू आहे. आज रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले. कांद्याला समानधारक भाव न मिळाल्यामुळे तसेच मक्याची शासकीय हमीभावाने संपूर्ण खरेदी न केल्यामुळे, चांदवड येथील बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी व विविध राजकीय पदाधिकारी आमरण उपोषण करत आहेत.
26 Feb, 26 11:35 AM
अजित पवार विमान अपघात: ब्लॅक बॉक्स सुरक्षित – किरण गुजर
एकीकडे बारामती तालुका पोलीस स्टेशन समोर आमदार रोहित पवार हे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येणार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आल्याची माहिती दिली आहे. “कोणीही तपासाबाबत विसंगती निर्माण करू नये,” असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, नगराध्यक्ष सचिन सातव, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या उपस्थितीत बारामती शहरातील शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
26 Feb, 26 11:05 AM
महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक, सरकारला घेरण्याची तयारी
काँग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, उद्धवसेना गट नेते अजय चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित आहेत. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीपासून महायुती सरकारला घेरण्याची चर्चा होणार आहे.
26 Feb, 26 10:56 AM
आता नोंदणीसाठी ऑनलाइन ई-बॉण्ड घेण्याची सवलत मिळणार
आता नोंदणीसाठी ऑनलाइन ई-बॉण्ड घेण्याची सवलत देण्यात आली आहे. या ई-बॉण्डमुळे मुद्रांक शुल्क (ड्युटी) ऑनलाइन भरता येणार आहे. नागरिकांना आता घरबसल्या ई-बॉण्ड काढता येईल. मुद्रांक शुल्क विभागाने हे एक आधुनिक पाऊल उचलले आहे - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
26 Feb, 26 10:42 AM
हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का
हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. हिंगोलीतील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
26 Feb, 26 10:16 AM
बारामतीमध्ये पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन; अजित पवार यांच्या अपघाताची चौकशीची मागणी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी होत आहे. आज या प्रकरणी बारामती पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. आमदार रोहित पवार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत. पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
26 Feb, 26 10:16 AM
रोहित पवार बारामती पोलीस स्टेशनला पोहचले
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी VSR कंपनी आणि DGCA तील दोषी अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. या मागणीसाठी रोहित पवार बारामती पोलीस स्टेशनला पोहचले आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्तेही जमा झाले आहेत. FIR दाखल केल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे.
26 Feb, 26 09:58 AM
मुंबई महापालिकेकडून यंदा ७,४५६ कोटींची तरतूद
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वर्षभरात ६,५२५ कोटी (८ टक्के) रुपयांची वाढ झाली असली तरी आरोग्य सेवांसाठीच्या तरतुदीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जेमतेम १ टक्का वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत नागरिकांना प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महापालिकेची आहे. गेल्या वर्षी पालिकेने आरोग्य सेवांसाठी अर्थसंकल्पात रु. ७,३८० कोटींची आर्थिक तरतूद केली होती. तर यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी रु. ७,४५६ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ साधारण १ टक्का असल्याचे दिसून आले आहे. (आणखी वाचा)
26 Feb, 26 09:41 AM
PM मोदींचे इन्स्टाग्रामवर बनले तब्बल १० कोटी फॉलोअर्स
इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्स असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील पहिलेच नेते बनले आहेत. मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे सोडले आहे. मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर ट्रम्प यांचा नंबर लागतो. त्यांचे ४ कोटी ३२ लाख फॉलोअर्स आहेत तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांता यांचे दीड कोटी फॉलोअर्स आहेत.
26 Feb, 26 09:32 AM
दुचाकी पार्किंगच्या किरकोळ वादातून गंभीर मारहाणीची घटना घडली
छत्रपती संभाजीनगर येथील शहागंज परिसरात दुचाकी पार्किंगच्या किरकोळ वादातून गंभीर मारहाणीची घटना घडली. हातगाडीचालकांच्या टोळक्याने दांपत्याला बेदम मारहाण केली. या घटनेत पाच महिन्यांची गर्भवती नंदिनी पगारे आणि त्यांचे पती प्रणव पगारे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे उपचार सुरू आहेत.
26 Feb, 26 09:07 AM
किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात
सध्या सुरू असलेल्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहान आपल्या बॅटने आग ओकत आहे. सुपर ८ टप्प्यातील चुरस वाढली असतानाच, फरहानकडे आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. साहिबजादा फरहानने चालू विश्वचषकात आतापर्यंत ५ डावांमध्ये २८३ धावा कुटल्या आहेत. २०१४ च्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने ३१९ धावा करून एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम मोडण्यासाठी फरहानला आता केवळ ३७ धावांची गरज आहे. २८ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जर फरहानने या धावा केल्या, तर तो टी-२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल. (आणखी वाचा)
26 Feb, 26 09:04 AM
राज्यसभेच्या ४ जागांसाठी भाजपकडून २५ नावे
राज्यसभा निवडणुकीसाठी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीने संभाव्य २५ नावांची एक यादी केंद्रीय भाजपकडे पाठविण्याचा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. यामध्ये भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी राज्यमंत्री दिलिप कांबळे, भाजपचे नेते माधव भंडारी, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार प्रीतम मुंडे, पुसदच्या डॉ. संगीता फुसाटे आदींचा समावेश आहे. (आणखी वाचा)
26 Feb, 26 08:59 AM
बारामती पोलिसांच्या डायरीतून धक्कादायक खुलासा; अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मोठी अपडेट
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. व्हीएसआर कंपनीचे विमान मुंबईवरून सकाळी निघाले होते, हे विमान बारामतील विमानतळ परिसरात ८.४५ ला कोसळले. या विमानाचा जमिनीवर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. दरम्यान, आता या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार रोहित पवार यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर ब्लॅक बॉक्सचेही नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. आता बारामती पोलिस ठाण्यातील डायरीमधून 'ब्लॅक बॉक्स' बाबत मोठी माहिती समोर आली आहे. (आणखी वाचा)