शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News LIVE: महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा 'आसाराम बापू'; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:01 IST

Latest Maharashtra Marathi News Live Updates 18 March 2026:  मध्य-पूर्वेतील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना एक खळबळजनक माहिती ...

18 Mar, 26 06:57 PM

मुंबई: BKC पासपोर्ट कार्यालयाला विषारी गॅस बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: वांद्रे-कुर्ला संकुल येथील पासपोर्ट ऑफिस  बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने आज मोठी खळबळ उडाली. या ईमेलमध्ये दुपारी १:३० वाजता सायनाईड गॅस बॉम्बचा स्फोट होईल, असा दावा करण्यात आला होता. माहिती मिळताच मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आणि अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने संपूर्ण परिसराची कसून झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळला नाही.

18 Mar, 26 06:47 PM

खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद?, हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर झाली पाहिजे. त्याला कोणाचा तरी राजकीय आशिर्वाद असला पाहिजे, त्याच्या मागे ही कोणती राजकीय शक्ती आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

18 Mar, 26 06:44 PM

नाशिक जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारेच्या जल संधारण अधिकारी वैशाली ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

नाशिक जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारेच्या जल संधारण अधिकारी वैशाली ठाकरे आणि येथील कर्मचारी रवींद्र धारणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. 

18 Mar, 26 05:18 PM

मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या अडचणीत वाढ

आठ वर्षांपूर्वीच्या शिक्षक मारहाण प्रकरणात महापौर रितू तावडे यांना दोषमुक्त करण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी २०१६ साली तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

18 Mar, 26 05:12 PM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जखमी

रायगड जिल्ह्यातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज भीषण अपघात झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. खोपोली एक्सिटजवळ कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात इनोव्हा कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला असून टाटा टिगोर कारमधील चार जण जखमी झाले आहेत. अपघातात तीन कार, एक आयसर टेम्पो आणि एक बलकर अशा एकूण सहा वाहनांचा चक्काचूर झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

18 Mar, 26 05:10 PM

झारखंडमध्ये एसएसबी जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

झारखंडच्या छत्रा जिल्ह्यात एका ३१ वर्षीय सशस्त्र सीमा बल जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

18 Mar, 26 04:19 PM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जखमी

रायगड जिल्ह्यातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज भीषण अपघात झाला असून तिघांचा जागीच मृत्यू आणि चार जण जखमी झाले आहेत. खोपोली एक्झिटजवळ कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात इनोव्हा कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला असून टाटा टिगोर कारमधील चार जण जखमी झाले आहेत. अपघातात तीन कार, एक आयसर टेम्पो आणि एक बलकर अशा एकूण सहा वाहनांचा चक्काचूर झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

18 Mar, 26 03:44 PM

व्यावसायिक सिलेंडर वाटपाबद्दल केंद्र सरकारचा नवीन निर्णय

व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरबद्दल केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंतर मंत्रालयीन बैठकीत ऊर्जा पुरवठा आणि एलपीजी वितरणाबद्दल केंद्राने एक निर्णय घेतला आहे. व्यावसायिक वापराच्या एलपजीच्या वितरण व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. केंद्राने राज्यांना दिल्या जाणाऱ्या एलपीजी वाटपाच्या कोट्यात १० टक्के वाढ केली आहे. 

18 Mar, 26 03:22 PM

बदलापूरमध्ये पत्नीची गळा आवळून हत्या; पतीला पोलिसांनी केली अटक

बदलापूरमध्ये एका गंभीर घटनेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत महिलेचे नाव अश्वीनी थोरात असून, या घटनेमागे वादाची कारणे अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळेस बाहेर फिरण्याची सवय असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी पती चंद्रकांत थोरात याला बदलापूर पश्चिम पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.  

18 Mar, 26 03:20 PM

अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीसाठी CM देवेंद्र फडणवीसांचे अमित शाहांना पत्र

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे.

18 Mar, 26 02:55 PM

भाजपला धोबीपछाड देत सांगली जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा

सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती.  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचाच अध्यक्ष होणार असा दावा केला होता. दरम्यान, आता अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संगीत पाटील  विजयी झाल्या आहेत.

18 Mar, 26 02:00 PM

शिंदेंनी ठाकरेंचे चार नगरसेवक फोडले, जिल्हाप्रमुखांनीही उद्धवसेना सोडली

उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंनी झटका दिला. अकोला महापालिकेत निवडून आलेल्या चार नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. नगरसेवक मनोज पाटील, सागर भरूका, सोनाली सरोदे, सुरेखा काळे यांचे शिंदेंनी पक्षात स्वागत केले. उद्धवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. 

18 Mar, 26 01:54 PM

जालना जिल्ह्यात घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई, चौऱ्याहत्तर सिलेंडर जप्त

जालना जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांविरोधात पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत दोनशे पंचवीस कारवायांमधून चौऱ्याहत्तर घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तालुकानिहाय पथके तैनात करण्यात आली असून यापुढे अशा प्रकारे गैरवापर आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. 

18 Mar, 26 01:53 PM

यलो अलर्ट जारी!

हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांसाठी इशारा देण्यात आला असून, पुढील दोन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागातील अधिकारी एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

18 Mar, 26 01:47 PM

राज्यात गॅस तुटवडा गंभीर; सरकार वास्तव नाकारत असल्याचा अनिल देशमुख यांचा आरोप

नागपूरसह राज्यभरात गॅस तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. घरगुती आणि कमर्शियल गॅससाठी नागरिकांना मोठ्या रांगांमध्ये उभं राहावं लागत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, राज्यात प्रत्यक्षात गॅसचा तुटवडा असताना देखील सरकारकडून “तुटवडा नाही” असं सांगितलं जात आहे. कोणत्याही जिल्ह्यात किंवा गावात गेलं तरी गॅस एजन्सीसमोर लांबलचक रांगा दिसतात, मात्र सरकार या वास्तवाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.देशमुख यांनी सरकारने परिस्थितीची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा आणि गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

18 Mar, 26 12:59 PM

इराणने इस्रायलने डागल्या शेकडो मिसाईल्स

इस्रायलने अली लारीजानी यांना हवाई हल्ला करत मारले. या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर पलटवार केला. इराणने १०० पेक्षा अधिक मिसाईल्स इस्रायलवर डागल्या. इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या बाहेरील भागात इराणच्या मिसाईलचा हल्ला झाला. या मिसाईल हल्ल्यात काही रहिवाशी इमारतींचे नुकसान झाले असून, जीवित हानीही झाली आहे. 

18 Mar, 26 12:42 PM

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ ज्योतिषी अशोक खरातला ठोकल्या बेड्या

 भोंदूगिरी करणारा स्वयंघोषित कॅप्टन ज्योतिषी संशयित आरोपी अशोककुमार एकनाथ  खरात यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका पिडित महिलेने त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल खरातविरुद्ध नोंदवून मध्यरात्री उशीरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

18 Mar, 26 12:40 PM

नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप

अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतने 'सरके चुनर' गाण्यावर टीका केली आहे. संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाने आपला संताप व्यक्त केला. ती म्हणाली, "अश्लीलता आणि चीप पीआर स्टंट्सच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्यासाठी बॉलिवूडने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संपूर्ण देश त्यांचा धिक्कार करत आहे, त्यांना फटकारत आहे. पण मला वाटत नाही की त्यांना काही लाज उरली आहे. अशा प्रकारची गाणी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, ही काही नवीन गोष्ट नाही." वाचा सविस्तर

18 Mar, 26 11:42 AM

दिल्लीत इमारतीला भीषण आग; पालम परिसरातील आगीत ६ जणांचा मृत्यू

बुधवारी दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पालम भागातील साध नगर येथील चार मजली इमारतीला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत तीन मुलांसह एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर इतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर एकाच कुटुंबातील नऊ ते दहा सदस्य इमारतीत अडकले होते. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि रुग्णवाहिकांची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले.

18 Mar, 26 11:20 AM

आखाती युद्धाचा फटका पैठणच्या केळी चिप्स उद्योगाला

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील केळी चिप्स उद्योगावर आखाती देशांमधील युद्धपरिस्थितीचा परिणाम होताना दिसत आहे. गॅस टंचाईमुळे चिप्स उत्पादकांना चुलीवर उत्पादन करावे लागत असून त्यामुळे गुणवत्तेत घसरण आणि विक्रीत घट होत आहे. वाढत्या खर्चामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

18 Mar, 26 10:42 AM

टाटाकडे गेली तरी सुधारणा नाही...!

टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडिया विमान कंपनीच्या सेवेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दिल्लीहून लखनौकडे जाणाऱ्या विमानात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांना देण्यात आलेल्या जेवणात बुरशी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराबाबत तक्रार केली असता विमान कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (सविस्तर  वाचा)

18 Mar, 26 10:12 AM

भाजपने पैशांच्या बळावर राज्यसभा निवडणूक जिंकली- राऊतांचा आरोप

18 Mar, 26 10:08 AM

"इराणकडून अमेरिकेला धोका, हे धादांत खोटं

"उच्च पदस्थ इस्रायली अधिकारी आणि प्रभावशाली अमेरिकने पत्रकारांनी चुकीची माहिती पसरवली गेली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका फर्स्ट ही मोहीम कमकुवत झाली होती. त्यानंतर इराण अमेरिकेसाठी मोठा धोका तयार करत असल्याचे सांगितले गेले. जे की धादांत खोटं आहे", असा गंभीर आरोप करत अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर, तसेच राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी झटका असल्याचे बोलले आहे. (सविस्तर वाचा) 

18 Mar, 26 10:07 AM

गोंदिया : गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांची एजन्सीसमोर गर्दी

युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर तुटवड्याच्या अफवा पसरत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येत आहे. अफवेमुळे नागरिक गॅस एजन्सीसमोर गर्दी करताना दिसत आहेत.... मात्र, सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून सर्व नागरिकांना नियमित पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

18 Mar, 26 10:06 AM

इराण बर्बाद होईपर्यंत हल्ले सुरु ठेवा, अरब राष्ट्रांची मागणी

इराणची लष्करी ताकद पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय हे युद्ध थांबवू नका. इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि ड्रोन शक्ती कायम राहिली, तर भविष्यात आपल्या ऊर्जा प्रकल्पांना आणि व्यापारी मार्गांना मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती या देशांना वाटत आहे. त्यामुळे इराण पूर्णपणे बर्बाद होईपर्यंत हल्ले सुरू ठेवा अशी मागणी अरब राष्ट्रांनी अमेरिकेकडे केली आहे.

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026IranइराणLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई