Top Marathi News Live: मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूककोंडी, २ ते ३ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:39 IST2026-02-11T07:45:04+5:302026-02-12T14:39:18+5:30
अजित पवार यांच्या मृत्यू हा अपघात आहे की घातपात, असा थेट प्रश्न उपस्थित करून, त्यासाठीचे सविस्तर प्रेझेंटेशन सादर करून ...

Top Marathi News Live: मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूककोंडी, २ ते ३ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा
अजित पवार यांच्या मृत्यू हा अपघात आहे की घातपात, असा थेट प्रश्न उपस्थित करून, त्यासाठीचे सविस्तर प्रेझेंटेशन सादर करून रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या प्रश्नांना कोण आणि काय उत्तरे देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील दाव्यांवरून लोकसभेत सुरू असलेला गोंधळ थांबतच नसल्याने बजेटवरील चर्चा रखडली आहे. चंद्रपूर महापालिकेतील महापौर निवड हा चर्चेचा विषय ठरला आहे, तर टी 20 वर्ल्ड कपमधील भारत पाकिस्तान साम्यावरून बरीच चर्चा आहे.
LIVE
12 Feb, 26 : 02:38 PM
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूककोंडी, २ ते ३ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा
मुंबई- नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून महामार्गावर २ ते ३ किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. उड्डालपुलाच्या अपूर्ण कामामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
11 Feb, 26 : 06:58 PM
"मुंबईत भाजपची सत्ता आली आणि लोकशाहीचा गळा घोटायला सुरुवात ही केली", काँग्रेस खासदाराने व्हिडीओ केला शेअर
मुंबई महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या वेळी सभागृहात काही नगरसेवकांना बसायलाच जागा नव्हती. काँग्रेसच्या काही नगरसेवकांना खाली बसावे लागले असा आरोप करण्यात आला. याबद्दल काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
"मुंबई महापालिकेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आली आणि लोकशाहीचा गळा घोटायला सुरुवात ही केली! आज मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभेत काँग्रेसच्या २४ नगरसेवकांना बसण्याची जागा देण्यात आली नाही. लोकशाहीत लोकांमधून निवडणून आलेल्या लोकप्रतिनिधींना आज पहिल्याच दिवशी महापालिकेच्या सभागृहात अपमानास्पद वागणूक मिळाली. यातूनच भाजप विरोधकांना किती पाण्यात बघते हे स्पष्ट आहे. महिला महापौर असताना काँग्रेसच्या महिला नगरसेवकांना जमिनीवर बसण्याची वेळ भाजपने आणली, सत्ताधारी भाजपचा हा माज जनता बघत आहे", अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
मुंबई महापालिकेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आली आणि लोकशाहीचा गळा घोटायला सुरुवात ही केली!
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 11, 2026
आज मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभेत काँग्रेसच्या २४ नगरसेवकांना बसण्याची जागा देण्यात आली नाही! लोकशाहीत लोकांमधून निवडणून आलेल्या लोकप्रतिनिधींना आज पहिल्याच दिवशी महापालिकेच्या सभागृहात… pic.twitter.com/P1Y2nedGnd
11 Feb, 26 : 06:26 PM
उद्या देशभरातील बँक राहणार बंद? कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, १० संघटनांची घोषणा
गुरुवारी अर्थात १२ फेब्रुवारी रोजी देशातील बँक अधिकारी आणि कर्मचारी संपावर जाणार आहेत. याचा थेट परिणाम बँकिंग प्रणालीवर होणार आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन आणि एम्पलॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांसह १० संघटना यात सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये केलेल्या चार नवीन कामगार कायद्यांना बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्याविरोधात १२ फेब्रुवारी रोजी संप करणार आहेत.
11 Feb, 26 : 06:02 PM
'त्यांनी एकत्रिकरणाच्या चर्चेचे पुरावे द्यावे', सुनील तटकरेंची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) सातत्याने एकत्रिकरणाची चर्चा झाली होती, असे दावे केले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी आपण पुरावे देऊ असेही म्हटले आहे. याबद्दल सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
सुनील तटकरे म्हणाले, "ते पुरावे देतील. बघूयात. पुरावे दिल्यानंतर भाष्य करता येईल. आज मला घाई काय? त्यांच्याकडे काही माहिती असेल. पुरावे असतील, तर त्यांनी जरुर द्यावेत. मला हे कळत नाही की, विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांचे शव विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलेले असताना करण्याची घाई का आणि कुणाला झाली? याचे उत्तर अजून काही मिळालेले नाही. उद्या पत्रकार परिषद झाली. विलिनीकरणाचा विषय असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा त्यांच्याशी संबंध असेल, तर बोलू."
11 Feb, 26 : 05:41 PM
मुंबईच्या उपमहापौरांना विशेष अधिकार द्या-उपमहापौर संजय घाडी
मुंबई शहराचा विकास आणि नागरी समस्यांची प्रभावी सोडवणूक करण्यासाठी उपमहापौरांना विशेष अधिकार मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी केली. यापूर्वीच्या उपमहापौरांनीही केलेल्या या मागणीचा पुनरुच्चार करतानाच, यासाठी कायद्यात योग्य ती दुरुस्ती करून प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करावा. शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी उपमहापौरांना अधिकार देणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
उपमहापौरांच्या भाषणातील मुख्य मुद्दे -
- पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या झाडांची निगा राखा, ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विशेष योजना राबवाव्यात. तसेच, काही ठिकाणी झाडे मुद्दाम मारण्याचे प्रकार घडत असून दोषींवर कडक कारवाई करावी.
- भटक्या कुत्र्यांमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. महानगरपालिकेने कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारावीत आणि त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदीची ठोस अंमलबजावणी करावी.
- मुंबईतील अनेक स्मशानभूमी आणि दफनभूमीमधील सोयी-सुविधांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक त्या सर्व सेवा पुरवण्याकडे प्रशासनाने लक्ष - महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ही गळती थांबवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
- शहर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
11 Feb, 26 : 05:36 PM
थायलंड हादरलं! डे-केअर सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, २२ चिमुकल्यांसह ३४ जणांची हत्या
थायलंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ लहान मुलांसह एकूण ३४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एका माजी पोलीस अधिकाऱ्याने डे-केअर सेंटरमध्ये घुसून ३४ जणांचा बळी घेतला. वाचा सविस्तर...
11 Feb, 26 : 05:22 PM
राष्ट्रवादी (शरद पवार) एनडीएमध्ये येत असेल तर विलिनीकरण करणार का? सुनील तटकरे म्हणाले...
दिल्लीत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, "जर तर वरती मी कसं बोलणार? २०१९ किंवा २०१४ पासून भाजपासोबत सरकारमध्ये असावे, अशी अजित पवारांची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये अजित पवारांनी स्पष्टपणे ती भूमिका मांडली होती. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधीही झाला होता."
"२०२३ मध्ये वारंवार पक्षात चर्चा होऊनही भाजपासोबत जाण्याचा निर्णय होत नव्हता. त्यावेळी आम्ही एनडीएमध्ये सामील झालो. तो पुढच्या काळातही आम्ही एनडीएमध्ये राहणार आहोत", असे सांगत तटकरेंनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलणंच टाळलं.
11 Feb, 26 : 04:29 PM
शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर...
शिंदेंच्या शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांचा महापालिकेत शपथविधी झाल्यानंतर सेनेच्या सर्व नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली
11 Feb, 26 : 04:05 PM
भिवंडीत रिक्षा चालकांचा संताप; महापालिकेचे मुख्य गेट रिक्षांनी बंद
भिवंडी शहरातील मंडई परिसरातील रिक्षा स्टँडजवळ, पोलीस चौकीसमोर टपऱ्या उभारण्यात आल्याने रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा उरलेली नाही. या संदर्भात पालिका प्रशासनाकडे मागील वर्षभरात पाच वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप लाल बावटा रिक्षा चालक-मालक युनियनने केला आहे.
11 Feb, 26 : 03:43 PM
थरार... दुसऱ्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर लागला निकाल!
टी २० वर्ल्ड कपमध्ये आज द. आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर लागला. द. आफ्रिकेने अफगाणिस्तानसमोर १८८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, हातातोंडाशी आलेला विजयाचा घास एका चुकीने हिरावला गेला. फ्री हिटवर अफगाणिस्तानचा शेवटचा फलंदाज रनआउट झाला आणि सामना सुपर ओव्हरवर गेला. या सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत द. आफ्रिकेने १७ धावा केल्या आणि सुपर ओव्हरही 'टाय' झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २३ धावा कुटल्या. अफगाणिस्तानची सुरुवात अगदीच खराब झाली. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट गेल्यानं सामना हातातून सुटलाच होता. मात्र, रहमनुल्ला गुरबाजने पुढच्या तीनही चेंडूंवर षटकार खेचले. अफगाणिस्तानला विजयासाठी एका चेंडूत सहा धावांची गरज होती. केशव महाराजचा चेंडू वाईड पडला आणि एक अतिरिक्त धाव त्यांना मिळाली. त्यानंतर एक चौकार बसला असता तर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली असती. मात्र, शेवटच्या चेंडूवर विकेट गेली आणि द. आफ्रिकेनं अटीतटीचा सामना जिंकला.
11 Feb, 26 : 03:28 PM
बीडमध्ये पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू
बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. मैदानी शारीरिक चाचणीदरम्यान धावण्याच्या फेरीत सहभागी झालेला एक उमेदवार अचानक चक्कर येऊन मैदानावर कोसळला.
घटना घडताच उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदत करत त्या उमेदवाराला बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
11 Feb, 26 : 02:18 PM
"पंतप्रधान दबावाखाली आहेत"; 'एपस्टीन' फाइलवरून राहुल गांधींचा मोठा आरोप
"मी थेट सांगतोय की, तुम्ही भारत विकला आहे. तुम्हाला भारत विकताना लाज वाटत नाही का? तुम्ही आपल्या आईला, म्हणजेच भारत मातेला विकले आहे. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे, मला माहित आहे की सामान्य परिस्थितीत पंतप्रधान देशाला विकणार नाहीत. मग त्यांनी भारत का विकला, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण त्यांनी (अमेरिकेने/परकीय शक्तींनी) पंतप्रधानांचा गळा आवळला आहे. त्यांनी पंतप्रधानांची मान पकडली आहे. आम्हाला पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसतेय. यामागे दोन मुख्य गोष्टी आहेत- पहिली म्हणजे 'एपस्टीन'. या प्रकरणातील ३० लाख फाईल्स अजूनही बंद आहेत," असे राहुल गांधींनी म्हटलं.
11 Feb, 26 : 02:14 PM
ज्या डेटाने महासत्ता व्हायचं होतं, तोच पंतप्रधान मोदींनी गमावला- राहुल गांधी
"आम्ही आमची तुलना पाकिस्तानशी होऊ देणार नाही. जर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना आपल्यासोबत नाश्त्याला बोलावले, तर त्यावर आम्हाला आमचे मत मांडावेच लागेल. आता नेमकं काय झालंय? तुम्ही (मोदी सरकारने) ट्रम्प यांच्याशी जो व्यापारी करार केला आहे, त्यात भारताचे मोठे नुकसान केले आहे. २१ व्या शतकात भारताचे भविष्य बदलणारा आणि देशाला महासत्ता बनवणारा जो 'डेटा' (माहिती) आहे,मोदी सरकारने आपल्या डेटासह हेच केले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
#WATCH पार्लियामेंट में लोकसभा LoP और कांग्रेस MP राहुल गांधी ने कहा, "... हम पाकिस्तान के बराबर नहीं बनेंगे। अगर प्रेसिडेंट ट्रंप ने तय किया कि पाकिस्तान आर्मी चीफ उनके साथ ब्रेकफास्ट करेंगे, तो हमें इस बारे में कुछ कहना होगा। अब क्या हुआ? आपने एक ट्रेड डील की है... जो चीज़… pic.twitter.com/jojqtWQJc6
— ANI_HindiNews (@AHindinews) February 11, 2026
11 Feb, 26 : 02:09 PM
"भारतीय लोकच तुमचा डॉलर वाचवू शकतात"; राहुल गांधींनी अमेरिकेला ठणकावलं
"जर इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असती, तर आम्ही त्यांना काय बोललो असतो हे मी तुम्हाला सांगतो. सर्वात आधी आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांना हे सांगितले असते की, या संपूर्ण समीकरणामध्ये भारतीय डेटा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला तुमचे डॉलर वाचवायचे आहेत? आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही तुमचा आदर करतो आणि तुमचे डॉलर वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. पण, हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला तुमचे डॉलर वाचवायचे असतील, तर तुमच्या डॉलरला वाचवू शकणारी सर्वात मोठी संपत्ती ही भारतीय लोकांकडे आहे," असं राहुल गांधी म्हणाले.
#WATCH पार्लियामेंट में, लोकसभा LoP और कांग्रेस MP राहुल गांधी ने कहा, "अगर INDIA अलायंस प्रेसिडेंट ट्रंप के साथ बातचीत कर रहा होता। मैं आपको बताता हूं कि हम क्या कहते। सबसे पहले हम प्रेसिडेंट ट्रंप से कहते, इस इक्वेशन में सबसे ज़रूरी चीज़ इंडियन डेटा है। आप अपना डॉलर बचाना चाहते… pic.twitter.com/KksOVp77yC
— ANI_HindiNews (@AHindinews) February 11, 2026
11 Feb, 26 : 02:03 PM
अमेरिका आमचे सारे निर्णय कशी काय घेतेय? हे होलसेल सरेंडर, लोकसभेत राहुल गांधींचा घणाघात
अमेरिका आमचे सारे निर्णय कशी काय घेतेय? हे होलसेल सरेंडर आहे, भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावरून लोकसभेत राहुल गांधींची केंद्र सरकारवर घणाघाती टीका
11 Feb, 26 : 01:39 PM
मुंबईच्या कोस्टल रोडवर ऐकू येणार 'जय हो' गाण्याची धून...
मुंबईच्या कोस्टल रोडवर वाहनचालकांना 'जय हो' गाण्याची धून ऐकू येईल असं तंत्रज्ञान रस्त्यावर बसवण्यात आलं आहे. कोस्टल रोड हा भारतातील पहिला संगीत मार्ग ठरला आहे. याचं उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. उदघाटनावेळी फडणवीसांनी याची माहिती दिली...
11 Feb, 26 : 01:24 PM
शरद पवारांच्या तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं सोमवारी पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्या सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असून प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टर अभिजीत लोढा यांनी दिली. स्ट्रेसमुळे आणि अधिक लोकांच्या संपर्कात आल्यानं इन्फेक्शन झालं होतं, ते अँटिबायोटिक्समुळे नियंत्रणात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आणखी एक-दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवणार असल्याचंही ते म्हणाले.
11 Feb, 26 : 01:20 PM
केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरू, अर्थमंत्री उपस्थित नसल्याने राहुल गांधी यांनी घेतला आक्षेप
केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. मात्र चर्चेवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमन उपस्थित नसल्याने राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे.
11 Feb, 26 : 12:27 PM
मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे विराजमान
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे विराजमान, तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड
11 Feb, 26 : 12:12 PM
मुंबई मनपाच्या महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित
मुंबई मनपाच्या महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महानगरपालिकेमध्ये उपस्थित आहेत.
11 Feb, 26 : 12:06 PM
मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांकडून जोरदार घोषणाबाजी
मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, सभागृहामध्ये महायुती आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
11 Feb, 26 : 11:42 AM
मुंबईच्या महापौर रितू तावडे पदभार स्वीकारण्यासाठी पोहोचल्या...
भाजपचा महापौर आज पदाभार स्वीकारणार, रितू तावडे महापालिका मुख्यालयात पोहोचल्या, काय म्हणाल्या? पाहा...
11 Feb, 26 : 11:24 AM
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आज त्यांनी मोदींची भेट घेतली. यानंतर त्या अमित शाह यांनाही भेटणार आहेत.
11 Feb, 26 : 10:55 AM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संसद भवनात दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संसद भवनात दाखल झाल्या आहेत. सुनेत्रा पवार ह्या आज उपराष्ट्रपतींची भेट घेऊन राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार
11 Feb, 26 : 10:23 AM
धुळ्यात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात; ९,००० उमेदवार मैदानात
पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात; १३३ जागांसाठी तब्बल ९,००० अर्ज दाखल धुळे जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. १३३ जागांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही मैदानी चाचणी पार पडत आहे.
11 Feb, 26 : 10:09 AM
कॅनडामधील शाळेत बेछूट गोळीबार, १० जणांचा मृत्यू
कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियातील एका शाळेत आणि आजबाजूच्या परिसरात एका हल्लेखोराने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश आहे.
11 Feb, 26 : 09:51 AM
महापालिका निवडणुकीतील बंडखोरीचा हिशेब; भाजपने ६९ कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर भाजपने कठोर कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. यामुळे पक्षशिस्तीचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने कठोर भूमिका घेत संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई केली.
11 Feb, 26 : 09:15 AM
भारतासाठी गुड न्यूज! करारातून डाळी वगळल्या
भारत–अमेरिका व्यापार कराराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यासंदर्भातील एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर अमेरिकेने जारी केलेल्या तथ्यपत्रकातही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा भारतासाठी दिलासादायक मानल्या जात आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या कराराअंतर्गत भारताने ५०० अब्ज डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तू खरेदी करण्याची अट आता बदलण्यात आली आहे. म्हणजेच ही खरेदी आता बंधनकारक राहिलेली नाही. (अधिक वाचा)
11 Feb, 26 : 08:31 AM
मुंबई: पतीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
मुंबईतील गोवंडी परिसरात मंगळवारी (१० फेब्रुवारी) दुपारी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली. पतीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका २५ वर्षीय महिलेने १९ वर्षांच्या तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे शिवाजी नगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
11 Feb, 26 : 08:24 AM
तेलंगाणामधील पालिका निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात
तेलंगाणामधील पालिका निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
#WATCH | Warangal, Telangana: Municipal elections are underway in Wardhannapet Municipality in Warangal district.
— ANI (@ANI) February 11, 2026
Visuals from a polling station at Fusco's School. Voters have been casting their votes since early morning. pic.twitter.com/lGpPelhrhf
11 Feb, 26 : 08:00 AM
पिंपरीमधील ट्रान्सपोर्टनगर येथे खाजगी बसला आग
पिंपरीमधील ट्रान्सपोर्टनगर येथे खाजगी बसलाआग लागली असून, यात तीन खाजगी बस जळून खाक झाल्या आहेत.
11 Feb, 26 : 07:58 AM
मुंबई महानरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक
मुंबई महानरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणुकीची औपचारिकता पूर्ण होणार. मुंबईत पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बसणार हे निश्चित झाल्याने भाजपामध्ये उत्साह