Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या; नाव न घेता उद्धव ठाकरेंचा आनंद महिंद्रांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 10:05 PM2021-04-02T22:05:08+5:302021-04-02T22:15:19+5:30

Maharashtra Lockdown: उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

Maharashtra Lockdown: Uddhav Thackeray slams Anand Mahindra on Lockdown, Corona Virus | Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या; नाव न घेता उद्धव ठाकरेंचा आनंद महिंद्रांना टोला

Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या; नाव न घेता उद्धव ठाकरेंचा आनंद महिंद्रांना टोला

Next
ठळक मुद्देगेल्या दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी  राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. (Maharashtra Lockdown: Uddhav Thackeray slams Anand Mahindra on Lockdown, Corona Virus)

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी  राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

"काही उद्योगपती म्हणतात की आरोग्य यंत्रणा वाढवण्यासाठी भर द्या. हॉस्पिटल उभारा. मात्र, नुसते फर्निचर उभे करून काय उपयोग? त्यासाठी डॉक्टर नकोत का? काही उद्योगपती हा सल्ला देत आहेत. त्यांना मी सांगतो, तुम्ही ५० डॉक्टर द्या, आपण तेही करू", असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.  

काय म्हणाले होते आनंद महिंद्रा?
लॉकडाऊनच्या मुद्द्यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे.  'उद्धवजी, समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया', असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी  ट्विट करत  ठाकरे सरकारला दिला आहे.

( परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलोय - मुख्यंमत्री)

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :-
- पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही 
- राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार 
- लॉकडाऊन करणार का? याचं उत्तर मी अजून देणार नाही
- रस्त्यांवर उतरा, पण नागरिकांच्या मदतीसाठी, विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला
- लॉकडाऊनबाबत सल्ला देणाऱ्या उद्योगपतीलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला
- विरोधी पक्षाच्या लॉकडाऊनबाबतच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांची टीका
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सात कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय
- कोरोना काळात राजकारण नको.
- सर्वपक्षांनी राज्य सरकारला सहकार्य करावं
- रुग्ण वाढ थांबवण्यासाठी सध्या कुठलाही उपाय नाही
- लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम
- कोरोनाची लस घेतली तरी मास्क अनिवार्य. 
- अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळाख्यात
- मला व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणार
- सध्या मुंबईतील रुग्णसंख्या दररोज साडे आठ हजारांवर पोहोचली आहे.
- राज्यात एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणार नाही.

 

Web Title: Maharashtra Lockdown: Uddhav Thackeray slams Anand Mahindra on Lockdown, Corona Virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.