शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:43 IST

Maharashtra Lockdown: प्रवाशांची गर्दी वाढल्याने उन्हाळ्यातील विशेष गाड्यांसह पुरेशा गाड्या उपलब्ध असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. एप्रिल महिन्यासाठी ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्यात येईल.

मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन लावण्यात आले आहव त्यामुळे मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी, लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आपल्या गावी चालले आहेत. मध्य रेल्वे दररोज मुंबईते देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात सरासरी २८ गाड्या चालवत असून १४ दिवसात साडेतीन लाखाहून अधिक मजुरांनी गाव गाठले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.प्रवाशांची गर्दी वाढल्याने उन्हाळ्यातील विशेष गाड्यांसह पुरेशा गाड्या उपलब्ध असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. एप्रिल महिन्यासाठी ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्यात येईल. याशिवाय, सीआर दररोज १८ नियमित प्रवासी गाड्या चालवत राहील. १ ते १४ एप्रिल दरम्यान सुमारे ३.५ लाख लोकांनी त्यांच्या मूळ शहरांमध्ये प्रवास केला आहे. प्रत्येक आउटस्टेशन ट्रेनमध्ये सुमारे १,४०० लोक प्रवास करत असतात. महिन्याच्या अखेरीस, सीआर गाड्यांमध्ये आणखी चार लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी सहा लाख स्थलांतरितांना त्यांच्या मूळ शहरांमध्ये नेण्यासाठी ४०० श्रमिक विशेष गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.अनेक गाड्या उत्तर व पूर्वेकडील ठिकाणांची आहेत.  उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्या सोडण्याशिवाय मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर क्षेत्रांतून ७ एप्रिल ते १५ एप्रिल आतापर्यंत ७६ उन्हाळी विशेष गाड्या उत्तर व पूर्वेकडील गंतव्यस्थानांकरिता चालविल्या आहेत.

७६ विशेष गाड्या  उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्या सोडण्याशिवाय मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर क्षेत्रांतून ७ एप्रिल ते १५ एप्रिल आतापर्यंत ७६ उन्हाळी विशेष गाड्या उत्तर व पूर्वेकडील गंतव्यस्थानांकरिता चालविल्या आहेत.गंतव्य ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या वेळेवर जाहीर केल्या जातील. गेल्या काही दिवसांपासून गावी परतणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे. 

रिक्षाचालकांची चांदी पनवेल रेल्वे स्थानकात येण्यासाठी पनवेल परिसरासह ग्रामीण भागातील प्रवासी रिक्षाचा आधार घेत आहेत. त्यानुसार लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांना चार दिवसांपासून चांगलीच मागणी वाढली आहे. शुक्रवारी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकात गर्दी वाढल्याने रिक्षाचालकांना चांगलाच व्यवसाय झाला. विना तिकीट आलेले प्रवाशांना प्रवेश दिला जात नसल्याने, परत आपल्या माघारी जात आहेत. तर पुढील दिवसाच्या तिकीटासाठी धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वे