महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 19:24 IST2019-10-21T19:21:12+5:302019-10-21T19:24:05+5:30
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सट्टेबाजारात तेजीत

महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज
मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सट्टेबाजार तेजीत आहे. आज विधानसभा निवडणुक राज्यात पार पडली असून सर्वच पक्षांनी मतदारांना आकर्षित कारण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यात सट्टेबाज देखील मागे नव्हते. सट्टेबाजांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात नवे सरकार हे युतीच असले तरी देखील महाराष्ट्रात महायुतीला २२० च्या पुढे जागा मिळणार नसल्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे.
देशात महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. दोन्ही राज्यांतील निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपासमोर सत्ता टिकवण्याचे तर काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे आवाहन आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकीत बंडखोरांमुळे भाजपला त्यांची मँजिक फिगर 220 जागा गाठताना दमछाक होऊ शकते असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकांवर 30 हजार कोटींचा सट्टा लागला आहे. तर राज्यात महायुतीला 288 पैकी 210 /215 सीट मिळण्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तविण्यात आला आहे. तर काँग्रेस - राष्ट्रवादीला जवळपास 55 ते 60 सीट मिळण्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. तर एमआयएम आणि मनसेला एक किंवा दोन जागा मिळण्याची शक्यता सट्टेबाजारात वर्तविण्यात आली आहे.
कोणत्या पक्षावर कितीचा सट्टा
भाजपा - 120 जागांसाठी - 1.60 पैसे भाव
शिवसेना - 85 जागांसाठी - 3.00 रूपये भाव
काँग्रेस - 30 जागांसाठी - 2.50 पैसे भाव
राष्ट्रवादी काँग्रेस - 30 जागांसाठी - 3.50 पैसे भाव
महाराष्ट्रसोबतच हरियाणामध्ये ही निवडणूक पार पडली. मात्र तेथे ही भाजपा सत्तेमध्ये येणार असल्याचे सट्टा बाजारातील सट्टेबाजांचा अंदाज आहे. भाजपाला जवळपास 75 जागा तर काँग्रेस देखील जवळपास 20 जागांचा आकडा गाठणार असल्याचं सट्टेबाजांचं म्हणणं आहे.