शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

क कमळातला, आणि क कपाटातला! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी भाजप बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:41 IST

‘क’ कमळातला आणि ‘क’ कपाटातला दोन्ही एकच आहे, असे केले आवाहन

वेंगुर्ले : ‘क’ कमळातला आणि ‘क’ कपाटातला दोन्ही एकच आहे.त्यामुळे आपल्या मतदार संघातील भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून आपल्या हक्काचा आमदार विधानसभेत पाठऊया.यासाठी उरलेल्या पाच दिवसांसाठी आपण महिलांनीच स्वतः उमेदवार बनून कपाट ही निशाणी घरा घरात पोहचूया असे आवाहन गाेव्याचे मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांच्या पत्नी आणि गाेवा महिला माेर्चा अध्यक्षा साै. सुलक्षणा सावंत यांनी केले.सावंतवाडी विधानसभेचे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्लेतील साई मंगल कार्यालयात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना साै. सुलक्षणा सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुषमा खानोलकर, वंदना किंनळेकर, प्रज्ञा परब, सभापती स्मिता दामले, पूनम जाधव, सारिका काळसेकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, प्रज्ञा ढवण, डॉ. पूजा कर्पे, प्रार्थना हळदणकर, वृंदा गवंडळकर, राधा सावंत, गोव्याच्या महिला गोवा मोर्चा सचिव शीतल नाईक, पणजी बूथ अध्यक्ष सुषमा नाईक, प्रतिमा नायर, महिमा देसाई यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.साै. सावंत पुढे म्हणाल्या की आपल्या भागात गेली १० वर्षे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री केरकर उपचारासाठी चांगले सुसज्ज रुग्णालय उभारू शकले नाहीत, रोजगारासाठी एक इंडस्ट्रीज आणू शकले नाहीत, बचत गटातील महिलांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करू शकले नाहीत. त्यामुळे आता परिवर्तन पाहिजे आपल्या हक्काचा आपला आमदार पाहिजे यासाठी राजन तेली यांना निवडून आणून स्त्री शक्तीची ताकद दाखवून देऊया तसेच दिवाळीला तेली याना फराळ खायला बोलाऊया असे आवाहन त्यांनी महिलांना केले.यावेळी बोलताना सुषमा खानोलकर यांनी आपला हक्काचा आमदार म्हणून राजन तेली यांच्या कपाट या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया आणि कणकवलीत युती धर्म न पाळणाऱ्यांना जागा दाखवूया असे आवाहन केले.वंदना किनळेकर यांनी सांगितले की, आपले गृहमंत्री केसरकर यांच्यावर बाहेरून पोलीस मागविण्याची वेळ आल्याने त्यांचा स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही हेच दिसते. या प्रमाणेच त्यांचा स्थानिक महिलांवर विश्वास नाही म्हणून महिलांचे प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या निष्क्रिय आमदार केसरकर यांना घरी बसविणे हे आता महिलांचे पहिले काम आहे ते २१ तारीखला पूर्ण करूया असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. पुजा कर्पे यांनी मानले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाRajan Teliराजन तेली sawantwadi-acसावंतवाडीPramod Sawantप्रमोद सावंत