Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार, पक्षाकडून यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:56 PM2019-10-05T15:56:21+5:302019-10-05T15:56:33+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Maharashtra Election 2019: Congress announces 40 star campaigners for assembly elections | Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार, पक्षाकडून यादी जाहीर

Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार, पक्षाकडून यादी जाहीर

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीमध्ये शरद पवार, आजित पवार, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांचासह 40 जणांचा समावेश करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढवणार असून 38 जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसहअजित पवार, प्रफुल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे, अमोल कोल्हे, छगन भुजबळ, नबाब मलिक, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जितेंद आव्हाड, वंदना चव्हाण, अनिल देशमुख यांच्यासह 40 जणांचा स्टार प्रचारक यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

काँगेसने देखील याआधी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग, प्रियंका गांधी-वाड्रा, राहुल गांधी यांच्यासह गुलाम नवी आझाद, ज्योतिराजे शिंदे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचा समावेश आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Congress announces 40 star campaigners for assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.