शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार उद्या राज्यपालांना भेटणार; म्हणाले, महायुतीचंच सरकार येणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 5:16 PM

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच सरकार स्थापनेबाबत माहिती देण्यासाठी आपण आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटण्यासाठी गुरुवारी जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

राज्यात उदभवलेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमितीची बैठक आज पुन्हा एकदा झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,''विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेना, भजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीला जनादेश मिळाला आहे. या जनादेशाचा आदर व्हावा ही भाजपाची पहिल्यापासूनची भूमिका आहे. राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन व्हावं, यासाठी भाजपाचं पुढील प्रत्येक पाऊल पडेल. तसेच कुणीही कितीही प्रयत्न केले तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल.'' तसेच सरकार स्थापनेबाबत माहिती देण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात नवे सरकार स्थापन करण्याविषयीच्या तयारीची माहिती देण्यासाठी मी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या राज्यापालांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत,''असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड ३१ डिसेंबरपूर्वी करण्यात येणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. तसेच नवे जिल्हाप्रमुख आणि बुथप्रमुख निवडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाShiv Senaशिवसेना