शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 20:20 IST

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांच्या मतदारसंघांकडे राज्याचं लक्ष

मुंबई: विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार, याचं चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. राज्यातील बहुतांश महत्त्वाच्या नेत्यांच्या जागा सुरक्षित असून त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचं इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात असल्याचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियानं राज्यातील व्हीआयपी मतदारसंघाचा आढावा घेऊन सर्वेक्षण प्रसिद्ध केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर नैऋत्य), गिरीश महाजन (जामनेर), सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), चंद्रकांत पाटील (कोथरुड) आणि राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी) यांचा विजय सोपा असेल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदेही त्यांचा कोपरी-पाचपाखडीचा गड राखतील, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांना मात्र कडव्या लढतीचा सामना करावा लागणार आहे. जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांना कर्जत जामखेडमध्ये कडवी लढत द्यावी लागेल, असं इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाचं सर्वेक्षण सांगतं. याठिकाणी राष्ट्रवादीचे रोहित पवार रिंगणात आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंसमोर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचं कडवं आव्हान आहे. त्यामुळे परळीत चुरशीची लढत होईल, अशी शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.  वरळीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर फार आव्हान नसेल. मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये विजयासाठी कडवी लढत द्यावी लागू शकते, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजनPankaja Mundeपंकजा मुंडेRam Shindeराम शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदेRohit Pawarरोहित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारAditya Thackreyआदित्य ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAshok Chavanअशोक चव्हाण