CoronaVirus: “कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:02 PM2021-04-16T18:02:30+5:302021-04-16T18:07:54+5:30

corona: काँग्रेसकडून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे.

maharashtra congress criticised modi govt over corona situation | CoronaVirus: “कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते”

CoronaVirus: “कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते”

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीकाकोरोना परिस्थितीवरून साधला निशाणाट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरू आहे. देशात दुसरी लाट आल्याचे सांगितले जात असून, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत आहे. देशभरात कोरोना लसींचा तुटवडा, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता अनेक राज्यांमध्ये जाणवू लागली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेसकडून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते, अशी बोचरी टीका केली आहे. (maharashtra congress criticised modi govt over corona situation)

महाराष्ट्र काँग्रेसकडून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे. मात्र तरी देखील करोनाच प्रादुर्भाव वाढतच आहे. अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर्ससह मेडिकल ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकांचे जीवही गेले नसते

“करोनावरील इतरही लसींना मान्यता द्यावी” हा सल्ला राहुल गांधींनी फार आधीच दिला होता. मात्र लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करायची वेळ आल्यावर मोदी सरकारने इतर लसींना मान्यता दिली. जर हा निर्णय आधीच घेतला असता तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते!, असा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे. 

निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

राहुल गांधीची मोदी सरकारवर टीका

केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे, अशी टीका राहुल गांधींनी यापूर्वी केली होती. 

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 
 

Web Title: maharashtra congress criticised modi govt over corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.