Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:44 PM2019-11-28T12:44:28+5:302019-11-28T12:45:13+5:30

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

Maharashtra CM: Maasaheb and Respectful Balasaheb You want today - Supriya Sule | Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

Next

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीचे मंत्रिसुद्धा शपथ घेणार असून, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी भावनिक ट्विट केलं आहे. माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खूप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल, अशी भावनिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

तत्पूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनीही या आघाडी सरकारसंदर्भात ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. ट्विट करत त्या म्हणाल्या होत्या, आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू, असंही त्या म्हणाल्या आहेत.

 उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पंजाबचे कॅप्टन अमरेंद्र सिंग, भूपेश बघेल (छत्तीसगड), व्ही. नारायणस्वामी (पुड्डूचेरी), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) तसेच चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील 400 शेतकऱ्यांना विशेष निमंत्रित केले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर असताना एका शेतक-याने मला तुमच्या शपथविधीला बोलवा, अशी विनंती केली होती. त्या शेतक-यास आवर्जून निमंत्रण पाठवले आहे. त्यामुळे हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनण्याची शक्यता आहे. 

Web Title: Maharashtra CM: Maasaheb and Respectful Balasaheb You want today - Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.