शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Maharashtra Budget 2021: ठाकरे सरकारला इंधनदरवाढीवरून केंद्राला बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:09 PM

Maharashtra Budget 2021: इंधनदरवाढीवरून (Petrol Diesel Price Hike) केंद्र सरकारला जबाबदार ठरण्याचा किंवा त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा अधिकारच ठाकरे सरकारला उरलेला नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांचे अर्थसंकल्पावर शरसंधानइंधनदरवाढीवरून आता केंद्राला बोलण्याचा अधिकार राज्याला नाही - फडणवीसराज्याचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं असल्याची फडणवीस यांची टीका

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. इंधनदरवाढीवरून (Petrol Diesel Price Hike) केंद्र सरकारला जबाबदार ठरण्याचा किंवा त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा अधिकारच ठाकरे सरकारला उरलेला नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया देताना केला. (bjp leader devendra fadnavis slams thackeray government has no right to speak to center over fuel price hike)

इंधनदरवाढीचे फलक घेऊन येणाऱ्या सत्तापक्षाच्या आमदारांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने एक नवा पैसाही पेट्रोल-डिझेलवर कमी केलेला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकारच राहिलेला नाही. राज्य सरकारने लावलेल्या करांमुळेच महाराष्ट्रात पेट्रोल गुजरातपेक्षा पेट्रोल १० रुपयांनी महाग आहे. राज्याने कर कमी केल्यास पेट्रोल स्वस्त होऊ शकेल. मात्र, तसा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ: अजित पवार

अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं 

केंद्राकडून आलेला निधी सांगायचा नाही. केवळ थकबाकी सांगायची. केंद्राच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख अर्थसंकल्पात करायचा. मात्र, अन्य वेळी केंद्रावर टीका करायची. हेच महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. अर्थसंकल्पात याचाच प्रत्यय आला. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विशिष्ट भागांपुरता मर्यादित असलेला अर्थसंकल्प

महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प म्हणावे की काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित असलेला अर्थसंकल्प म्हणावे, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. अजित पवारांनी केलेल्या घोषणांमध्ये बरेचसे प्रकल्प आधीपासूनच सुरू आहेत. यातील काही प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने प्रगतीपथावर आहेत. त्यात अनेक रस्ते, महामार्ग, सिंचन आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. एका बाजूला केंद्राला नावे ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख स्वत:च्या अर्थसंकल्पात करायचा, अशी सोयीस्कर भूमिका राज्य सरकार घेत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनFuel Hikeइंधन दरवाढDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार